महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन दिवा शहरात !

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन दिवा शहरात !

 कोल्हापूर जिल्हा रहिवाशी संघ दिवा यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन रविवार दि. १९ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता ग्लोबल शाळेचे मैदान, दिवा आगासन रोड, दिवा स्टेशन (पूर्व) येथे केले असून या स्पर्धेकरिता प्रथम क्र. रोख रुपये २१००१/- व बोकड, द्वितीय क्र.१५००१/-, तृतीय क्र.१०००१/- , उत्तेजनार्थ रोख रुपये १००१/- ची तीन बक्षिसे अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेते व सहभागी संघांना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेसाठी नामदार श्री. एकनाथजी शिंदे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य,ठाणे जिल्हा पालकमंत्री, डॉ.श्री. श्रीकांतजी शिंदे खासदार, श्री. प्रकाशराव आबिटकर आमदार राधानगरी भुदरगड आजरा, श्री. रमाकांत मढवी ठाणे मनपा उपमहापौर यांसह प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर रत्न जागतिक किर्तीचे शरीरसौष्ठवपट्टू श्री. सुहास खामकर उपस्थित राहणार आहेत.

   महाराष्ट्राच्या या लाल मातीतील रांगड्या खेळात मुंबई ठाणे दिवा शहरातील जास्तीत जास्त संघांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे सल्लागार श्री. विठ्ठल घेवडे (9594736181), श्री. कृष्णा पाटील (9870565122) यांनी केले आहे.


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week