
नायर रुग्णालयाकडून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या ११८ सामाजिक संस्थांचा सन्मान.
नायर रुग्णालयाकडून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या ११८ सामाजिक संस्थांचा सन्मान.
शनिवार दि.१ फेब्रुवारी २०२० रोजी नायर रुग्णालयाच्या वतीने आपापल्या विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या सामाजिक संस्थांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अधिष्ठाता नायर हॉस्पिटल डॉ. रमेश भारमल, सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.जतिन शहा तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला आपापल्या विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध संस्थांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
अशीच सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचे पवित्र कार्य गेली १० वर्षांपासून विभागात करत कार्यरत असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई या संस्थेचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते पार पडला.