
शिवशाहू प्रतिष्ठान आयोजित कृतज्ञता व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मुंबईत प्रचंड उत्साहात संपन्न.
शिवशाहू प्रतिष्ठान आयोजित कृतज्ञता व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मुंबईत प्रचंड उत्साहात संपन्न.
रविवार दि.२२ डिसेंबर २०१९ रोजी डिलाईल रोड विभागात शिवशक्ती क्रीडा मंडळ पटांगण, मोगल हाऊस, करीरोड (पश्चिम) येथे कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान च्या वतीने कृतज्ञता व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा प्रचंड उत्साहात गर्दीत संपन्न झाला. नुकत्याच दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या कोल्हापूर महागांव ता.गडहिंग्लज येथील शहीद जवान जोतिबा गणपती चौगुले यांना उपस्थितांच्यावतीने श्रद्धांजली वाहून सोहळ्याची सुरवात करण्यात आली.
ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर सहीत पश्चिम महाराष्टावर ओढवलेल्या नैसर्गिक संकटात पूरस्थिती मध्ये प्रतिष्ठान ने केलेल्या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत विभागातील संस्था,मंडळे यांनी जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य,औषधे,प्रत्यक्ष आर्थिक मदत देत जो मदतीचा आधाराचा हात देत देश,भाषा,प्रांत,धर्म यापलीकडे जाऊन ईश्वरी अंशाचे जे दर्शन घडवले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वाना कृतज्ञता सन्मान चिन्ह देण्यात आले.
त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत कोल्हापूर च्या गौरवात भर घालणाऱ्या कर्तृत्ववान कोल्हापूर रत्नांचा सन्मान यामध्ये श्री.ऐ.व्ही.रेडेकर (राष्ट्रपती पदक विजेते सहाययक आयुक्त जी एस टी) श्री.श्रीपती गुंडू नाईक (नायब तहसीलदार,वांद्रे) कु.सुष्मिता श्रीधर गुडुळकर (सुवर्ण पदक विजेती प्रबंध शोध) श्री.कृष्णा हरीबा जाधव (राष्ट्रपती पदक विजेते,मुंबई पोलीस) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या सोहळ्यासाठी आमदार श्री.प्रकाश आबिटकर,मा.आमदार श्री.सुनील शिंदे, कलर्स वाहिनी यांच्या सहकार्याने बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचे सहनिर्माते राकेश नारायण राऊत, सिनेकलाकार कोमल मोरे(सत्यवा),अक्षय टाक(तात्या), ड्रॉ.पवन अगरवाल, शाखाप्रमुख श्री. दिपक बागवे, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे श्री.बाळा पवार,भालचंद्र पाटे, मुंबईचा डबेवाला संघटनेचे अध्यक्ष श्री.सुभाष तळेकर, मुंबई तसेच उपनगरातील कोल्हापूर जिल्हा फेडरेशनचे प्रतिनिधी उपस्थीत होते. उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठानच्या गेल्या दहा वर्षातील सामाजिक कार्याची आढावा घेणारी विशेष पुरवणी जीवन भोसले यांच्या संकल्पनेतुन व दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.
उपस्थित कोल्हापूर वाशियांच्या सोहळ्यात आमदार प्रकाश आबिटकर, मा.आमदार सुनील शिंदे यांनी शिवशाहू प्रतिष्ठान च्या कृतज्ञता संकल्पनेचा, सामाजिक कार्याचा गौरव करत या मुंबई शहरात कोल्हापूर वाशियांच्या पाठीशी राहून हक्काचे कोल्हापूर भवन उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वस्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव कृष्णा पाटील यांनी उत्तमरीत्या सांभाळले. कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या हजारो मुंबईस्थित कोल्हापूरवासीयांचे व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या प्रतिष्ठानच्या पदाधिकऱयांचे आभार अध्यक्ष श्री.रविंद्र देसाई व कार्याध्यक्ष राजू येरुडकर यांनी मानले.