एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन रिपोर्टींग कशाला ?

एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन रिपोर्टींग कशाला ?

       काही वृत्त वाहिन्या (न्युज चॅनेल) यांना समर्पित !

           एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन रिपोर्टींग फक्त आपल्याच देशात होते !

       पेटणारे सरणावरील मृतदेह, रुग्णांनी भरलेले हॉस्पिटल, स्मशानात मृतदेहांची लागलेली रांग, असहाय् नातेवाईक...

       हे सर्व वारंवार दाखवून काय सिद्ध करत आहोत आपण? कसली जागृती आणतोय आपण?? महामारी आहे, सर्वाना माहीत आहे..

         सर्व काही हाताच्या बाहेर जातंय, याच हि सर्वांना भान आहे..

           नक्कीच रिपोर्टींग करा,,,,

या महामारीतून ठीक झालेल्या रुग्नांच्या मुलाखती घ्या.

        कमतरता भासत असलेले ऑक्सिजन सिलेंडर कुठे मिळतात हे लोकांना सांगा.

      प्लाज्मा डोनर्स चा परिपूर्ण माहितीकोष तयार करा.

       कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड खाली आहेत याची माहिती जनतेस द्या.

         आवश्यक रेमडीसीविर इंजेक्शन कोठे मिळते याची माहिती द्या.

          रुग्णवाहिका सेवा याची माहिती दया.

परंतु....

       आपणांस हवी फक्त सनसनाटी बातमी सर्वत्र भीतीचे वातावरण पसरवून काय साध्य करू पाहता आपण??


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week