कोणतेही मराठी पुस्तक फक्त दहा रुपयात !

कोणतेही मराठी पुस्तक फक्त दहा रुपयात !

           माय मराठी साद मराठी !

        भाषांचा भावार्थ मराठी !

     बात मराठी साथ मराठी !

   जगण्याला या अर्थ मराठी!!

  मराठी राज्यभाषा २७ फ्रेब्रुवारी दिनानिमित्त दहा ते तीस रुपये किंमतीचे कोणतेही मराठी पुस्तक फक्त दहा रुपयात !

 

   सर्वसामान्य माणसांना दैनंदिन गरजा व त्यांना हवी असलेली मार्गदर्शनपर माहिती असलेली उदाहरण महिलांसाठी पाककृती, शैक्षणिक, संस्कार माला, संत चरित्रमाला, धार्मिक पर्यटन अशा विविध विषयांवरील सामाजिक उपयोगी तसेच मुलांवर संस्कार घडवणारी लहान मोठी दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणाऱ्या साटम उद्योगाने मराठी राज्यभाषा दिनानिमित्त वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी रुपये दहा ते तीस रुपये ची मराठी पुस्तके फक्त दहा रुपयांत उपलब्ध करण्यात आली आहे "तुमच्या प्रिय व्यक्तीस विशेष प्रसंगी भेट देण्यासाठी उपयुक्त माहितीपुर्ण पुस्तकांचा खजिना" तरी या सवलतीचा लाभ वाचक प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन वृत्तपत्र विक्रेता संघाचे जीवन भोसले यांनी केले आहे.

    प्रदर्शन दिनांक २५ फ्रेब्रुवारी ते ९ मार्च पर्यंत सकाळी १० ते संध्या ६ वाजेपर्यंत खुले राहिल, स्थळ :- साटम उद्योग, २०३ अमित इंडस्ट्री इस्टेट, डॉ.एस.एस.राव रोड गांधी हाॅस्पिटल जवळ, लालबाग मुंबई ४०००१२.

अधिक माहितीसाठी ८१६९९८४९२७


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week