महिला भजन स्पर्धेत विजया संगीत भजन मंडळ अंतिम विजयी !!
महिला भजन स्पर्धेत विजया संगीत भजन मंडळ अंतिम विजयी !!
मुंबई: सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई यांच्या वतीने प्रथमच मुंबई स्थरावर महिला भजन स्पर्धा - २०२४ चे आयोजन, नानासाहेब सभागृह, स्टार मॉल, न. चि. केळकर मार्ग, दादर (पश्चिम ) येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत विजया संगीत भजन मंडळ, चेंबूर हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. ज्ञानदीप मंडळ, दादर व सायन भगिनी समाज अनुक्रमे दुसरा व तिस-या क्रमांकाने विजयी झाले. तसेच स्वरसखी (शिवाजी पार्क), दैवज्ञ हितवर्धक समाज (दादर) व तालपुष्प या भजन मंडळाना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर करण्यात आली.
विजयी भजनी मंडळाना उपस्थित मान्यवराचे हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रके देऊन सन्मानीत करण्यात आले. स्पर्धाचे परीक्षण शिल्पा पटवर्धन, शुभांगी सहस्त्रबुद्धे, कविता कोठारे व अर्चना ठाकूर यांनी केले.
भजन स्पर्धेसाठी संस्थेचे वतीने कार्यकारी विश्वस्त - सतीश सावंत, सह अनुश्री माळगावकर, नरेंद्र सावंत, प्रभाकर परब, विठ्ठल गवस, बाळ पंडित व लक्ष्मण सावंत उपस्थित होते.
महिला अध्यक्षा वैशाली सावंत, स्पर्धा प्रमुख पूर्णिमा धारगळकर, वैभवी गावडे, शैला परब, सुलक्षणा शेट्ये, सुषमा राणे व सुचिता सावंत यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फारच मेहनत घेतली होती.