एस टी कामगारांच्या पगार वाढीची घोषणा करावी !!

एस टी कामगारांच्या पगार वाढीची घोषणा करावी !!

        एस टी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री यांनी कामगारांच्या पगार वाढीची घोषणा करावी अशी मागणी कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवणे यांनी केली आहे. दि १ जून २०२१ रोजी एस टी महामंडळाचा वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री तथा अध्यक्ष म रा प महामंडळ एड अनिल परब कामगारांच्या हिताचे निर्णय जाहीर करणार आहेत, कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाची नोटीस देण्यात आली आहे त्या नोटीस मध्ये कामगार करार संपुष्टात येऊन १४ महिने झाले आहेत मात्र पगार वाढीच्या बाबत काहीही हालचाल दिसत नव्हती त्यामुळे आंदोलन नोटीस देण्यात आली आहे सन २०१६-२०२० च्या पगार वाढीची घोषणा तत्कालीन परिवहन मंत्री तथा अध्यक्ष मा ना दिवाकर रावते यांनी दि १ जून २०१८ रोजी महामंडळाच्या वर्धापन दिनी केली होती त्यानंतर झालेल्या दि ८-९ जून २०१८ रोजीच्या संपानंतर दि ९ जून २०१८ रोजी दिवाकर रावते यांनी सर्व संघटनांची बैठक सह्याद्री अतिथी गृहात घेतली होती त्यावेळी वेतन वाढीचा दर एक टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेतला होता व घरभाडे भत्ता दर ८-१६-२४ असा वाढविण्याचा निर्णय घेतला होता मात्र ह्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली नाही, कामगार कराराची मुदत संपून १४ महिने झाले आहेत मात्र अद्याप पगार वाढीची घोषणा करण्यात आली नाही सेवानिवृत्त रा प कर्मचारी अधिकारी यांना कराराच्या फरकाची रक्कम व रजा रोखीकरणाची थकीत रक्कम सुद्धा अद्याप देण्यात आली नाही अधिकारी यांना सुद्धा कराराचा लाभ एप्रिल २०१६ पासून देण्यात यावा आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नावर कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेच्या वतीने दि २ जून २०२१ पासून सर्व विभागीय कार्यालयासमोर तसेच आगार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाची आंदोलन नोटीस दिली आहे तरी दि १ जून २०२१ रोजी रा प महामंडळाच्या वर्धापन दिनी श्री. अनिल परब परिवहन मंत्री तथा अध्यक्ष यांनी नवीन कामगार करारापोटी अंतरिम पगार वाढीची घोषणा करावी तसेच वरील मागण्या सोडविण्याची घोषणा करावी अशी विनंती कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवणे यांनी केली आहे.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने