समाजसेवक शंकर झोरे यांच्या वाढदिवसानिमीत्त गरिबांना मोफत अन्नधान्य वाटप !!

समाजसेवक शंकर झोरे यांच्या वाढदिवसानिमीत्त गरिबांना मोफत अन्नधान्य वाटप !!

          क्रॉफर्ड मार्केट येथील खंबीर नेतृत्व, दक्षिण मुंबईचा वाघ, गोर गरीब जनतेचा कैवारी समाजसेवक शंकर झोरे यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी क्रॉफर्ड मार्केट येथील सीताराम बिल्डिंग येथे धुमधडाक्यात साजरा होणार आहे. झोरे यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त विभागातील गोर गरीब जनतेसाठी मोफत अन्नधान्य वाटप असा सामाजिक उपक्रम ठेवला आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांना देखील ते मदत करणार आहेत.

          मी दरवर्षी वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रम राबवत असतो. यावर्षी मी गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करणार असून विभागातील गरीब जनतेने या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समाजसेवक शंकर झोरे यांनी केले आहे.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर