
६० ते ६५ वर्षातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात सवलत हवी.
६० ते ६५ वर्षातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात सवलत हवी.
ज्येष्ठ नागरिकांची मागणी !
शासनाच्या दिनांक २४ ऑगस्ट २०२२ च्या आदेशा नुसार राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत करण्यात आला. तसेच ६५ ते ७५ वर्षापर्यंत च्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास ५० टक्के सवलतीत अनुज्ञेय आहे. परंतु राज्यातील ६० ते ६५ वर्षातील ज्येष्ठाना या पूर्वी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत अनुज्ञेय होती. करोना कालावधीत रेल्वे सवलत पूर्णतः बंद करण्यात आली होती. नवीन आदेशातही ६० ते ६५ वर्षातील ज्येष्ठाची ५० टक्के सवलत बंद करण्यात आली आहे. हा ज्येष्ठ नागरिकावर अन्याय नाही काय? शासनाने ज्येष्ठाचा एसटी सवलती बाबत पुनच: विचार करावा.
महाराष्ट्र शासनाने दि २४ ऑगस्ट २०२२ रोजीचा शासन निर्णय सुधारित करून ६० ते ७४ वर्षातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतीत एसटी प्रवास करण्यात यावा व तसे आदेश पारित करावेत अशी सर्व ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे.