
राज्यातील तब्बल ११० निवृत्त रेल्वे पोलिसांना निवृत्त वेतन द्या - आमदार सुनिल शिंदे यांची लक्षवेधीसूचनेद्वारे अधिवेशनात मागणी !!
राज्यातील तब्बल ११० निवृत्त रेल्वे पोलिसांना निवृत्त वेतन द्या - आमदार सुनिल शिंदे यांची लक्षवेधीसूचनेद्वारे अधिवेशनात मागणी !!
राज्यातील तब्बल ११० निवृत्त रेल्वे पोलिसांना निवृत्त वेतनाची वाढत्या महागाईतही प्रतिक्षा कायम आहे. आयुष्यातील उमेदीच्या काळात १२-१६ तास कर्तव्य बजावणाऱ्या व २०१९ मध्ये निवृत्त झालेल्या पोलिसांना अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अद्यापही निवृत्ती वेतन सुरू झालेले नाही.
वयाची साठी ओलांडल्याने या निवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना अनेक व्याधी जडल्या आहेत. उतरत्या वयात हक्काच्या निवृत्ती वेतनासाठी पोलीस आयुक्तालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या या निवृत्त पोलिसांच्या वेतनासंदर्भात शासन कार्यवाही स्पष्ट करण्याबाबत आमदार सुनिल शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली व सरकारचे लक्ष वेधले.
(सौजन्य - प्रसाद सावंत)