
सायन प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरातील घर भाड्याचा प्रश्न सुटला !!
सायन प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरातील घर भाड्याचा प्रश्न सुटला !!
सायन प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरातील घर भाडे घेण्यासाठी गेले अनेक महिने म्हाडा प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी येत नव्हते त्यामुळे प्रतीक्षा नगर येथिल नागरिक त्रस्त झाले होते व सदर विषय स्थानिक रहिवासी वर्गाने विभागप्रमुख नगरसेवक श्री मंगेश सातमकर, नगरसेवक श्री रामदास कांबळे, शाखाप्रमुख श्री संजय म्हात्रे ह्यांना सांगितल्यावर त्यांनी म्हाडा सभापति श्री विनोद घोसाळकर ह्यांच्या दालनात बैठक घेतली. सदर बैठकीत म्हाडा मुख्य अधिकारी श्री डोंगरे व संबधीत अधिकारी उपस्थित होते सदर बैठकीत लवकरच सायन प्रतिक्षा नगर संक्रमण शिबिरातील घर भाडे चालू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे व सदर घरभाडे कोणतेही अतिरिक्त दंड न घेता घेण्यात यावे असे आदेश सभापति श्री विनोद घोसाळकर ह्यांनी दिले आहे.
सभापती श्री विनोद घोसाळकर ह्यांच्या दालनात बैठकीत मुंबई ईमारत दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी श्री डोंगरे, शिवसेना विभगप्रमुख नगरसेवक श्री मंगेश सातमकर, नगरसेवक श्री रामदास कांबळे, शाखाप्रमुख श्री संजय म्हात्रे, उपशाखाप्रमुख श्री सुधीर शिरगावकर, श्री गणेश शिंदे उपस्थित होते. सदर घर भाडे चालू करण्याचे आदेश सभापती श्री विनोद घोसाळकर ह्यांनी दिल्यावर त्यांचे व म्हाडा अधिकारी वर्गाचे आभार शिवसेना विभागप्रमुख नगरसेवक मंगेश सातमकर, रामदास कांबळे ह्यांनी मानले.