
कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी घेतली युक्रेन येथून परतलेल्या सुप्रिया राणेची भेट !!
कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी घेतली युक्रेन येथून परतलेल्या सुप्रिया राणेची भेट !!
वरळी - प्रभादेवीची सुकन्या डॉ. सुप्रिया राणे गेले अनेक दिवस युक्रेन मध्ये अडकलेली होती. ती मायदेशी परतली आहे याची माहिती मिळताच कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी येथे तिच्या घरी जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. तसेच तिचे पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत केले. तसेच तिला भावी आयुष्यात कोणत्याही मदतीची आवश्यकता भासल्यास तसेच तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी घेतली.
वरळी प्रभादेवी येथील विद्यार्थिनी युक्रेन मध्ये शिक्षणासाठी गेली होती नुकतीच ती युक्रेनमधून आपल्या मायदेशी परत आली असल्याची माहिती मिळताच खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली तिच्या घरी जाऊन तिची विचारपूस केली तसेच तिच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी घेतली असून यापुढे देखील तिला कोणतेही आर्थिक मदत लागल्यास तिने माझ्याशी संपर्क साधावा तो संपूर्ण खर्च करण्यास मी तयार असल्याची माहिती भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस, कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी दिली.