गोरेगाव येथे ज्येष्ठाचा आनंद मेळावा संपन्न !!

गोरेगाव येथे ज्येष्ठाचा आनंद मेळावा संपन्न !!

        गोरेगाव (पूर्व) येथील संकल्प सहनिवास ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने, दीपावली निमित्ताने, ज्येष्ठाचा आनंद मेळावा नुकताच संकल्प संकुलात गणेश मंदिर समोरील बागेत संपन्न झाला.

          संघाच्या वतीने प्रत्येक महिन्यात ज्येष्ठाचे वाढदिवस, स्नेहसंमेलन, ज्येष्ठ नागरिक दिन साजरे केले जातात. मात्र लॉक डाउनच्या काळात महिलांसाठी श्रवणधारा, गायनाचा कार्यक्रम व पंढरीची वारी ऑन लाईन आयोजन केले होते.

       आनंद मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांनी एकमेकांना दीपावली व नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आनंद सोहळा साजरा केला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष- दिलीप धारकर, सचिव-सूर्यकांत सोडये, सदस्य- काशिराम चव्हाण, दादाजी सामंत, रामकृष्ण फोडनाईक,व इतर सभासदांनी विचार मांडून मार्गदर्शन केले. आनंद उत्सवास ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित