पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना !!

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना !!

        राज्यभरात ज्याठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे,  अशा ठिकाणी हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेच्या वतीने मोफत ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा करण्यात येणार आहे.

        शिवसेना प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. विकास मयेकर, सरचिटणीस शंकर झोरे, चिटणीस सुरेश कोळी, इमरान लाला, सुरेश भगत, कुतुबुद्दीन, शरद गावकर उपविभागप्रमुख वडाळा, अमोल शरद चौगुले उपविभागीय अधिकारी धारावी यांनी पाठपुरावा करून ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा एकत्र केला असून सदर सिलेंडर सातारा, महाड, कोल्हापूर विभागात ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे अशा ठिकाणी रवाना करण्यात येणार आहे.

       दक्षिण मुंबई शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष विकास मयेकर व त्यांचे सहकारी सदर सिलेंडर पुरवठा पूरग्रस्त भागात करणार आहेत.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने