
मराठा समाज मोदींच्या भेटीला जाणार - रामभाऊ गायकवाड मराठा क्रांती मोर्चा चे महाराष्ट्र राज्य समन्वयक !
मराठा समाज मोदींच्या भेटीला जाणार - रामभाऊ गायकवाड मराठा क्रांती मोर्चा चे महाराष्ट्र राज्य समन्वयक !
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मराठा समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सिंदखेड ते दिल्ली असा पायी प्रवास करणार असल्याची माहिती सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक श्री. रामभाऊ गायकवाड यांनी दिली.
मराठा क्रांति मोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चा व सकल मराठा समाज यांच्या वतीने आरक्षणाची पायी वारी आता दिल्लीच्या दारी करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मोठा पेच निर्माण झाला असून मराठा समाजाच्या हातामध्ये घोर निराशा आली आहे त्यामुळे आम्ही आज पर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेमध्ये 58 मूक मोर्चे काढले असून व आमच्या 42 बांधवांनी बलिदान दिले आहे तसेच आमच्या 13,700 युवकांवरती गंभीर प्रकारचे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन तरी अद्याप केंद्र सरकारने व राज्य सरकारने कोणताही न्याय देण्याची भूमिका समाजासाठी घेतली नाही आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नंतर मराठा आरक्षण रद्द झाले असून 50 टक्के च्या वरती कोणतीही आरक्षण मर्यादा वाढविण्याचा अधिकार कोणत्याही राज्य सरकारला राहिलेला नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे आम्ही केंद्र सरकारला विनंती करत आहे की आज पासून संसदेच्या लोकसभेच्या व राज्यसभेच्या कामकाजाचे पावसाळी अधिवेशन चालू होत आहे तरी केंद्र सरकारने व खासकरून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी केंद्र सरकारला विनंती करावी की 102 वी घटना दुरुस्तीच्या कायद्यामध्ये संबंधित बदल करून यासंबंधीचे अधिकार राज्य सरकारला प्रदान करण्यात यावे व आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यात यावी तसेच राज्य सरकारने जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय संविधानिक रित्या वैद्य होत नाही तोपर्यंत मराठा समाजातील सर्व घटकांना ओबीसी आरक्षणाच्या सवलती देण्यात याव्यात.. तसेच खालील प्रमुख मागण्यांचा गांभिर्याने विचार करण्यात यावा..
1) कोपर्डी येथील पीडित भगिणीला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा..
2)सारथी संस्थेला मुबलक प्रमाणात निधीचे वितरण करण्यात यावे व सक्षम करावे..
3)अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी देण्यात यावा तसेच मराठा समाजातील बलिदान दिलेल्या 42 कुटुंबातील मुलांना शासकीय नोकरी व प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर केली होती त्याप्रमाणे ती लवकरात लवकर देण्यात यावी..
तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारला आम्ही एक शेवटचा इशारा देत आहोत की जर का आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर निकाली नाही काढला तर आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने येणाऱ्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये जेधे आईसाहेब जिजाऊंचा जन्म झाला त्या सिंदखेडराजा बुतढाणा येथून आईसाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन आता आरक्षणाची पायी वारी दिल्लीच्या दारी या घोषणेखाली दिल्लिला जाणार. तरी लवकरात लवकर केंद्र सरकारने त्यांची भूमिका चालु पावसाळी अधिवेशनामध्ये स्पष्ट करुन सर्व मागण्या मान्य कराव्या व या क्षत्रिय समाजाला न्याय देण्याची भूमिका बजावावी तसेच राज्य सरकारने त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व मागण्या मान्य करून त्या संबंधीचा अध्यादेश लवकरात लवकर काढावा अन्यथा राज्य सरकारला, केंद्र सरकारला समाजाच्या आक्रोशचा प्रचंड मोठा सामना करावा लागेल याची नोंद घ्यावी तसेच यापूर्वीही समाजाच्या न्याय हक्कांसाठी पंढरपूर मधील आषाढी वारीच्या महापूजेला तत्कालिन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा रोखण्यात आले होते तरी या सर्व मागण्याचा प्रामुख्याने विचार करण्यात यावा.