
संकट काळात सर्वांना मदतीचा हात !!
भारतीय बौद्ध महासभा विरार शहर शाखा.. रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन पॅंथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वसई विरार शहर आणि ग्रामीण भागातील जनतेला वरिल सर्व पक्षांच्या सेवावृत्तीने संकट काळात गोरं गरीब गरजु लोकांना मदतीचा हात पुढे करण्यांत आला होता.
गरजूंना मोफत शिधा (रेशनिंग) घरपोच देण्यात आले होते.... ज्यांनी ज्यांनी फोन करून शिधा मागवलेल्यांना सुध्दा घरपोच राशन पोहोचविले आहे...
रिपब्लिकन सेना पालघर जिल्हा अध्यक्ष आयु. लवेश जी लोखंडे आणि त्यांचे कार्यकारी शिलेदार कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे आयु.नरेश जी मोरे व संपूर्ण त्यांची टीम तसेच बहुजन पॅंथरचे सचिव आयु. पॅंथर किर्तिराज लोखंडे व त्यांचे संपूर्ण पॅंथरचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा विरार शहर शाखेचे अध्यक्ष आयु. किरन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने गरजु लोकांना रोख रक्कम (धम्म दानं) स्वरूपात पाॅकेट देण्यात आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पालघर जिल्हा अध्यक्ष आयु. गिरीष जी दिवानजी ह्यांनी ही गरजूंना मदतीचा हात पुढे केला होता.
वरील सर्व सहकार्य करणाऱ्या लोकांना अनेक जणांच्या कुटुंबाकडून आशिर्वाद व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.