विरार ते बोरिवली सहा तास !

विरार ते बोरिवली सहा तास !

         अगोदरच लॉकडाऊनच्या काळात रेल्वे सेवा संपूर्ण सामान्य माणसाला बंद असल्याने काही खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

      विरार पश्चिमेला असलेल्या एसटी स्टँडवर प्रवाशांशी वार्तालाप केला असता तेथे असलेल्या कामगाराला कामावर जाताना येताना किती हाल होत आहेत हे देखील त्यांनाच माहीत.

   बातमीकार च्या प्रतिनिधींनी त्रस्त प्रवाश्यांसोबत चर्चा केल्यावर प्रवाश्यांनी व जनतेने सरकारलाच विनंती केली आहे की लवकरात लवकर कोरोना वर औषध उपाय करावेत व सर्व लोकल ट्रेन चालू कराव्यात.

    बोरिवली पुर्व व पश्चिम मार्गावर सकाळ संध्याकाळ दोन-तीन तास ट्रफीक जाम असतं. त्यामुळे कामगार आपल्या कामांवर वेळेत गेले नाही तर त्यांना नोकरी गमावण्याची टांगती तलवार कायम आपल्या डोक्यावर घेऊन फिरावे लागणार.


Batmikar
वार्ताहर - सुनील बेडे

Most Popular News of this Week