मी सदानंद दाते बोलतोय !

   ये वतन ये वतन हमको तेरी कसम तेरे कदमोंमे. जान तक लुटा जायेगे ये वतन ये वतन !

        कमांड चांगली असली म्हणजे प्रशासनही चांगल  काम करत. ह्याच उदाहरण म्हणजे २६/१२ च्या हमल्यात आतंकवादींना नामहरोम करणारे त्या वेळचे मुंबईचे पोलीस कमिशनर आय.पी एस. ऑफिसर श्री सदानंद दातेजी अतिशय प्रभावी आणि करारी व्यक्तिमत्व. आतंकवाद गुन्हा आणि देशासाठी लढण्याची हिम्मत ठेवणारे आणि आता मीरा-भाईंदर, वसई-विरारचा पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार सांभाळणारे श्री सदानंद दाते यांचा व्यक्ती परिचय देण्याची गरजच उरत नाही.

            मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयाला १ वर्ष पूर्ण झालं त्या निमित्ताने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयाचे पोलीस कमिशनर श्री. सदानंद दाते यांनी दिनांक २४ जानेवारी २०२१ रोजीचा वार्षिक अहवाल सादर केला. ते अहवाल सादर करताना म्हणाले की मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तलयाला १ ऑक्टोबर २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आणि संपूर्ण वर्ष आंम्हाला मीडियाचा सपोर्ट राहिला. म्हणून आजचा वार्षिक अहवाल प्रकाशनाचा सोहळा हा पोलीस आणि प्रसार माध्यम यांच्या सहभागाने करण्याचे आयोजन केले आम्ही कधी काही गोष्टी नाही करू शकलो त्यावेळेस प्रसार माध्यमांनी आमच्यावर टीका केली आणि तितकीच आमच्या चांगल्या कामाची प्रशंसा ही केली.

           प्रभू सारख साम्राज्य निर्माण होण्यास अनेक वर्षे लागली. आजच्या कार्यक्रमात मा. पोलीस ठाण्याचा लेखा जोखा, गुन्हे आणि गुन्हेगारी असली भरीव कामगिरी पार पाडण्यासाठी पोलीस दलाने अथक परिश्रम केले. गुन्हे आणि गुन्हेगारी यांचं निवारण होण्यासाठी डॉ महेश पाटील यांनी एक सशक्त क्राईम ब्रांच तयार केले.

             तीन डीसीपी, चार एसीपी यांची नियुक्ती करण्यात आली चांगली कामगिरी नेहमीच अवघड असते. प्रत्येक गुन्हा हा एक प्रश्न चिन्ह असतो, आणि त्या गुन्ह्याचा शोध लागण्यासाठी सशक्त पोलीस यंत्रणा आवश्यक असते, आणि ते गुन्हे तडीस नेण्यासाठी योजना व पाठपुरावा करावा लागतो. लहान मोठे गुन्हे रोजच घडत असतात आणि ह्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मीरा-भाईंदर वसई- विरार पोलीस आयुक्तलयाने विविध कार्यलये व यंत्रणा यांची स्थापना एक वर्षात केली. मीरा-भाईंदर वसई विरार हा पट्टा अतिशय मोठा व लांबलचक आहे. तो संम्पूर्ण नियंत्रणात रहावा, गुन्ह्याचा शोध त्वरित घेता यावा यासाठी पोलीस आयुक्तलयाने विभागात पोलीस ठाण्याची नियुक्ती केली. पोलीस उपआयुक गुन्हे व परिमंडळ-१ कार्यालय, नियंत्रण कक्ष, सहाय्यक पोलिस आयुक्त नालासोपारा कार्यालय, सहाय्यक पोलिस आयुक्त वसई कार्यालय, सहाय्यक पोलिस आयुक्त तुळींज कार्यालय इ. स्थापना करण्यात आली. तसेच पासपोर्ट शाखा, गुन्हे शाखा युनिट -२, आचोळे पोलीस स्टेशन, पेल्हार पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा वसई कार्यालय सुरू करण्यात आली. 


             तसेच नवीन उपक्रमात ई ऑफिस प्रणाली अंमलात आणणारे महाराष्ट्र राज्यातील पाहिले आयुक्तालय मीरा-भाईंदर वसई-विरार हे ठरले. ऑनलाइन तक्रार नोंदणी डायल ११२ सुरू करण्यात आले त्यासाठी वेगळे नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली. महिला तसेच जेष्ठ नागरिकांच्या तक्रारीला प्राधान्य देण्यासाठी भरोसा सेलची स्थापना करण्यात आली. एक कॅमेरा शहरासाठी या उपक्रमात शहराचा जास्तीत जास्त भाग नियंत्रणाखाली राहुन स्ट्रीट क्राईम वर नियंत्रण ठेवता यावे याकरीता जनतेला एक कॅमेरा बसविण्याचे आवाहन करण्यात आले. ह्यात लोकांच्या सहभागातून ५२१६ कॅमेरे आयुक्तालयाला प्राप्त झाले. बालके व हरवलेल्या महिला यांचा शोध घेण्यासाठी विशेष शोध कक्षाची स्थापना करण्यात आली.

             दहशतवाद विरोधी कक्ष, मनुष्यवध तपास पथक सुरू करण्यात आले, कोविड साथीचे रोग दरम्यान लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी ई विजिट उपक्रमाची सुरुवात केली. असे म्हणताना श्रीयुत दाते म्हणाले की, पासपोर्ट व्हेरिफिकेशन ला १५ दिवस जातात, परंतु नागरिकांना समस्या निर्माण होऊ नये म्हणून पासपोर्ट व्हेरिफिकेशन १ आठवडयात पूर्ण केले जाते. कार्यालयीन कर्मचारी यांच्यासाठी उपहारगृह सुरू केलं.

             गुन्हेगारीच प्रमाण जास्त असले तरी गुन्ह्याची निर्गती ही तितकीच जोमाने झाली आहे. गुन्ह्याचे शोध लागून गुन्हेगारास अटकही करण्यात आलेली आहे, वाहन चोरी, मनुष्य वध, घरफोडी, रस्त्यावरच्या वाहनांची लूट, स्ट्रीट क्राईम, अंमली पदार्थ सेवन आणि विक्री, दहशतवाद, स्फोटक पदार्थ, काडतुसे बंदुकीशस्त्रे हस्तगत केली. बलात्कार, किडन्यापिंग, देह विक्री दलाला मार्फत वेश्या गमन, लेडीज डान्स बार, अवैध रित्या राहणारे परकीय नागरिक गुन्हे, अश्या कितीतरी बाबींवर कारवाई करण्यात आली, आपल्या भाषणात पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी माहिती दिली. ह्या वर्षी नवीन भरती करण्यात येणार आहे. पोलीस सुरक्षा रक्षकांची कमी असल्याने महाराष्ट्र् गृहखात्याने ह्यास मंजुरी दिली आहे.

         ह्या नवीन वर्षात गुन्हे उकल दोषसिद्धी साठी क्युरेशन, डिक्टेशन, कम्युनिकेशन यांची सक्षमता करण्यात येईल, तसेच वाढत्या वाहनांच्या वाहतुकीची व्यवस्था तसेच सामाजिक कार्य मोल्ला कमिटीची पुनःश्च  सुरवात करणार आहे असे पोलीस आयुक्त श्री सदानंद दाते म्हणाले.

           ई नियंत्रण कक्षाची माहिती देताना पोलीस निरीक्षक कदम तसेच श्री सय्यद म्हणाले की ११२ या ऑनलाइन गुन्हा नोंदणी क्रमांकमुळे विभागात कुठेही गुन्हा घडला तर १५ मिनिटात पोलिसांचे शोध पथक गुन्हे स्थळी पोहचतात. परंतू नागरिकांनी या नंबरचा गैर वापर करू नये अथवा विनाकारण खोटे कॉल ही करू नये अशी विनित श्री सय्यद यांनी केली.

         मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला श्रीयुत सदानंद दाते पोलीस आयुक्त यांच्या सारखे करारी कणखर व्यक्तिमत्व असलेले पोलीस आयुक्त लाभले त्यामुळे पोलीस यंत्रणाही तितकीच कार्यक्षम बनली. अश्या कर्तव्यदक्ष आयुक्त, उप आयुक्त, सह आयुक्त, अंमलदार नामदार पो महिला पुरुष शिपाई, अधिकारी पूर्ण पोलीस यंत्रणा तसेच संपूर्ण डिपार्टमेंट यांचे बातमीकार वेब ऑनलाइन वृत्तपत्राद्वारे खूप अभिनंदन व त्यांच्या एक वर्षात यशवी केलेल्या कार्याला सलाम !


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week