
वसई पेशवेकालीन जरीमरी माता मंदिराचा १७ वा वर्धापन दिन थाटात साजरा !!
वसई पेशवेकालीन जरीमरी माता मंदिराचा १७ वा वर्धापन दिन थाटात साजरा !!
दिनांक १८ डिसेंबर ०२२ रोजी जरीमरी मंदिर वसई किल्ला रोड, ता वसई येथे मंदिराचा १७ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. किल्ला रोड वसई येथे असलेले मंदिर हे पेशवे कालीन मंदिर असून मंदिरातील मूर्ती ह्या पेशवेकाळातील दगडात कोरलेल्या आहेत. ही देवी सर्व मनोकामना पूर्ण करणारी अशी तिची ख्याती आहे.
वर्धापन दिनाच्या दिवशी सम्पूर्ण वसई तालुक्यातुन देवीच्या दर्शनासाठी भक्त येत असतात. वर्धापन दिनानिमित्त मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन असते जवळ जवळ हजार ते दीड हजार लोक प्रसादाचा लाभ घेतात. मंदिराचे सर्वे सर्वा उमेळमांन गावचे श्री दिनेश पाटील हे आहेत.
अभिषेक सावंत, संतोष अगस्कर, नागेश जाधव, संतोष पारद, शिवा सुळे, पावन देशमुख, विनोद सुरेला, श्रीकांत मोरे, अनंत आढवकर, गंगाराम कदम, रोहिदास कोंदर, रोहिदास म्हात्रे, विनिता कदम, माधुरी देशमुख, वंदना चव्हाण, स्वाती ठाकूर, रोहिणी सुरेला, प्रकाश गोर, बसंतीबाई पुरभे, प्रमोदींनी म्हात्रे, दिनेश राठोड, भानुमती पवार, सुरेंद्र पाटील, वंदना पाटील, जितू पासवान, सुनील झारखंड, संदेश पाटील, जावेद खान, नागेश पाटील, विनोद पाटील, चंद्रकांत घरत, प्रवीण घरत, प्रवीण पाटील, सुरेश लोटलेकर, राणा काका इ.देवीच्या भक्तांनी कार्यक्रमास सहाय्य करून दर्शनाला येणाऱ्या भक्त जनांची सेवा केली.