
निवृत्त शिवप्रेमींचा निरोप समारंभ संपन्न !
वस्तू व सेवा कर विभाग माझगाव मुंबई कार्यालयातील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सेवा निवृत्त शिवप्रेमी कर्मचा-यांचा निरोप समारंभ माझगाव कार्यालयातील वाचनालयात संतोष कोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सुधीर दिनकर कुंभार (राज्यकर अधिकारी), राजेंद्र गणपत सरगडे (राज्यकर निरीक्षक), सुरेश तुकाराम महाडिक (नोटिसवाहक) व उदय पांडुरंग साबळे (शिपाई) हे शिवप्रेमी वस्तू व सेवा कर विभागातून सेवा निवृत्त झाल्याने शाल श्रीफळ व शिवराज्याभिषेक प्रतिमा देऊन त्यांना गौरविण्यात आले.
निरोप समारंभास, समितीचे अध्यक्ष-संतोष कोरे, सचिव- रोहिदास तरे, सह सचिव - महेश कळसकर, सह रमेश गावडे, बबन गायकर, संजय सावंत, कृष्णा अंभोरे यांनी निवृत्त शिवप्रेमींना निरोप देऊन शुभेच्छा दिल्या. प्रस्तावना - लक्ष्मण पाटील व उपस्थितांचे आभार कृष्णा अंभोरे यांनी मानले. या सोहळ्यास असंख्य शिवप्रेमी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.