
नाशिक येथे हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्याचा निर्धार !
नाशिक येथे हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्याचा निर्धार !
छत्रपति राजर्षी शाहू महाराजांनी देशात प्रथम इ स 1902 मागासवर्गीयांना व बहुजन समाजाला 50% नोकऱ्यांत आणि शिक्षण क्षेत्रात आरक्षण दिलं होत.
याचं स्मरण आरक्षण विरोधकांना व्हावे व महाराजांच्या जातीहीन निकोप अशा निर्णयाची आजच्या राज्यकर्त्यांना जाणीव व्हावी, याच माफक अपेक्षेने 26 जून ही तारीख आरक्षण हक्क समितीने निवडली असुन मोर्च्याच्या तयारीसाठी आज रविवार दि १३ जून रोजी रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने रेल्वे मालधक्का, देवळाली, नाशिक येथे प्रादेशिक बैठकीचे आयोजन केले होते बैठकीचे अध्यक्ष रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे सरचिटणीस आत्माराम पाखरे यांनी ही लढाई समाजाची आहे. शैक्षणिक शिष्यवृत्तीमुळे आम्ही शिकलो, नोकरीतील आरक्षणामुळे नोकरी मिळाली व चांगल्या पदावर कार्यरत होतो हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेले हक्क आणि अधिकार आज जातीयवादी सरकारने काढून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. हे आपण वेळीच ओळखले पाहिजे त्या करिता मोठ्या ताकदीने सर्वच आरक्षण लाभार्थी समाज घटकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. येत्या २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहोत अशी माहिती दिली.
आयबीसेफचे अध्यक्ष सुनिल निरभवणे यांनी सांगितले की, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय शासनाने त्वरित मागे घेउन बंद केलेली फ्रिशिप सुरू करावी, पदवीपुर्व शिष्यवृत्ती सुरू करावी, अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकातील विद्यार्थी यांना देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट २० लाख रुपये करावी. कोव्हिड महामारीच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांत अनुसूचित जाती जमातीच्या समाज घटकांवर जातीयवादी लोकांनी केलेल्या अन्याय, अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करावी ह्या समाजाच्या प्रमुख मागण्या सोडविण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे तो यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एकदिलाने कामाला लागावे. कैनरा बैंक एस सी एस टी एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष शरद कांबळे यांनी केंद्र सरकारची खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. पुढच्या पिढीला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे तेव्हा आंदोलन तीव्र करावे लागणार आहे. अनुसूचित जाती जमातीच्या संघटनांचा अखिल भारतीय परिसंघाचे मुंबई, महाराष्ट्र प्रभारी डॉ. संजय कांबळे बापेरकर यांनी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले. आयबीसेफचे कोषाध्यक्ष व रेल्वे कामगारांचे नेते सिद्धार्थ कांबळे यांनी खाजगीकरणाच्या, कंत्राटीकरण, कामगार कायदे याबरोबरच पदोन्नतीच्या आरक्षणाबाबतच्या केसेस बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच रिपब्लिकन एम्पलाॅईज फेडरेशन खजिनदार सिद्धार्थ रणपिसे यांनी मोर्चा मोठा काढला पाहिजे असे सांगितले. रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख राम बाबा पाठारे यांनी नाशिक मधील मोर्चा सर्वात मोठा असेल असा विश्वास व्यक्त केला. संतोष वाघ यांनी आभार मानले. या बैठकीला मागासवर्गीय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी नाशिक विभागातील सर्व मागासवर्गीय संघटना व समाज यांनी मिळून नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्याचा निर्धार केला.