आरक्षण हक्क कृती समितीची मंत्रालयावर निदर्शने, राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा !!

आरक्षण हक्क कृती समितीची मंत्रालयावर निदर्शने, राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा !!

         मागासवर्गीय पदोन्नती संदर्भात आरक्षण कृती समितीच्या वतीने मंत्रालय येथे तीव्र निदर्शने करण्यात आली आता राज्यभर  आंदोलन  करण्यात येणार आहे.

     सरकारने दि. 7/5/2021 रोजी मागासवर्गीयांचे 33% आरक्षण रद्द केल्याने राज्यातील सर्व मागासवर्गीय संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आरक्षण हक्क कृती समितीने 20 मे रोजी जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयावर आक्रोश आंदोलन केल्यावर मा. मुख्यमंत्री, मा. शरद पवार यांच्याकडून दि. 24/5/2021 पासून भेटीची वेळ मागीतली होती, पण अद्याप भेट न दिल्यामुळे आज दि. 4/6/2021 रोजी आरक्षण हक्क कृती समितीने मंत्रालयात प्रत्यक्ष चौकशी केली परंतु भेटीबाबत काहीच हालचाल झालेली नाही असे निदर्शनास आले आहे, शरद पवार यांनीही अद्याप भेटीची वेळ दिलेली नाही तसेच आमदार श्री. मंगेश कुडाळकर व आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बैठक घेण्याबाबत विनंती केली असून सुद्धा काहीच कार्यवाही झालेली नसल्याचे दिसून आल्याने आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी आरक्षण हक्क कृती समितीने मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आरक्षण हक्क कृती समितीच्या कोअर कमिटी व राज्य निमंत्रक सर्वश्री हरिभाऊ राठोड (माजी खासदार), सुनिल निरभवने, अरुण गाडे, एस. के. भंडारे, सिद्धार्थ कांबळे, आत्माराम पाखरे, शरद कांबळे, दीपक मोरे, सिद्धार्थ रणपीसे यांच्या नेतृत्वात मागासवर्गीय कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निदर्शने केली.  हरिभाऊ राठोड, सुनिल निरभवने यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण मंत्री गट समितीच्या अध्यक्ष पदावरून व आशुतोष कुंभकोणी यांना अँडव्हॉकेट जनरल पदावरून तात्काळ हटविण्यात यावे आणि 7/5/2021 रोजीचा GR तात्काळ रद्द करून मागासवर्गीयांचे आरक्षण पूर्ववत सुरू करण्यासाठी मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी संघटना व समाज संघटना राज्यभर आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिल्याचे राज्य समन्वयक एस के भंडारे आरक्षण हक्क कृती समिती यांनी सांगितले आहे.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week