भायखळ्यात मुंबई काँग्रेसचे मानवी साखळी मौन आंदोलन !!

भायखळ्यात मुंबई काँग्रेसचे मानवी साखळी मौन आंदोलन !!

         केंद्र शासनाकडून लसीचा पुरवठा होत नसल्याने मुंबई काँग्रेसच्या वतीने भायखळा येथे मानवी साखळी मौन आंदोलन करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष श्री. भाई जगताप (आमदार) व मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री. चरणसिंग सप्रा (मा.आमदार) तसेच मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा. आमदार श्री. मधु अण्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार आज प्रभाग १८४ - भायखळा विधानसभा मतदार संघात केंद्र शासनाकडून लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याच्या विरोधात "मानवी साखळी मौन आंदोलन" करण्यात आले.


     या आंदोलनात भायखळ्याचे वॉर्ड १८४ चे निरीक्षक श्री. सुदर्शन सदानंद मंडलिक, मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, कार्यकर्ते आणि सरचिटणीस श्री. संदिप शुक्ला व इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week