पदोन्नतीतील आरक्षणाबाबत कौंग्रेस पक्षाची भूमिका संशयास्पद माजी आम. उपेंद्र शेंडे खोरीपा !

पदोन्नतीतील आरक्षणाबाबत कौंग्रेस पक्षाची भूमिका संशयास्पद माजी आम. उपेंद्र शेंडे खोरीपा !

     (नागपूर : प्रतिनिधी) पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर कौंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी नुकतीच ऑनलाइन पद्धतीने बैठक आयोजित केली होती व त्या बैठकीत पदोन्नतीतील आरक्षण ह्या मुद्द्यावर टोकाची भूमिका घ्यावी लागेल तसेच काही आमदारांनी सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका घ्यावी असे मत व्यक्त केल्याचे दिसून आले आहे दि ७ मे रोजीचा शासन निर्णय प्रसारित झाल्यानंतर कौंग्रेसचे राज्य सरकार मधील उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी टिकात्मक मत मांडायला सुरुवात केली दरम्यान लक्ष राज्यातील मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांच्या संघटना एकत्र आल्या व त्यांनी दि २० मे रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे दि १९ मे रोजी अचानक मंत्री गटाची बैठक झाली व त्या बैठकीत नितीन राऊत यांची अजित दादा पवार यांच्या बरोबर खडाजंगी झाली अशी बातमी पसरवण्यात आली व त्याच वेळी रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे नेते सुद्धा हा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, निवेदन, बातम्या देऊ लागले काही नेते राज्यपाल महोदयांना भेटायला गेले ह्या सर्व पाश्र्वभूमीवर कौंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने दि २५ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली ह्या बैठकीत आजी माजी  आमदार  माजी मंत्री व विविध मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते ह्या वेळी काही आमदारांनी सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका घ्यावी असे मत व्यक्त केले आहे खरे तर हा ह्या वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण कौंग्रेस पक्ष पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता नाही फक्त आपल्या पक्षाला पुन्हा एकदा मागासवर्गीय समाजाची मते मिळाली पाहिजे यासाठी प्रतिमा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे २०१४ ला सत्ता गमवावी लागली होती २०१९ ला सुद्धा खूप कमी  खासदार आणि आमदार निवडून आले होते सत्ता मिळण्याची शक्यता नव्हती मात्र शिवसेना आणि भाजप यांच्या भांडणात शरद पवार यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सत्ता मिळवली याचा लाभ कौंग्रेस पक्षाला झाला आता सत्ता गमवावी तर परत सत्ता मिळण्याची शक्यता नाही अशा वेळी सत्ता गमवायची नाही मात्र आम्ही मागासवर्गीयांच्या प्रश्नावर सत्ता सोडविण्याची तयारी ठेवली हा संदेश मागासवर्गीय समाजात पोहोचवायचा असा सर्व प्रकार सुरू आहे त्यामुळे मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ते व नेते यांनी हुरळून जाऊ नये कौंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष वेगळे नाहीत त्यांची विचारसरणी सारखीच आहे हे दोन्ही पक्ष मिळून मागासवर्गीय समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत नितीन राऊत यांना शरद पवार यांचा पाठिंबा आहे म्हणून त्यांना शिवाजी पार्कवर मंत्री पदाची शपथ देण्यात आली होती त्यांना ह्या मुद्द्यावर टोकाची भूमिका घेऊन हिरो बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे ह्या मुद्द्यावर अद्याप शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही ते शेवटच्या क्षणी हस्तक्षेप करून मार्ग काढला असे चित्र तयार करण्यात येईल आणि कौंग्रेस पक्षाने मागासवर्गीय मतपेढी सांभाळायची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मराठा मतपेढी सांभाळायची असा सर्व प्रकार आहे यापासून मागासवर्गीय समाजाने बोध घ्यावा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, कर्मचारी अधिकारी यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आंदोलन हाच एकमेव पर्याय आहे हे इतिहासातील उदाहरण पाहता लक्षात येईल आता कौंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ह्या सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीना घेराव घालून जाब विचारण्याची वेळ आली आहे तेव्हा आंदोलन यशस्वी करण्यासाठी जोमाने कामाला लागले पाहिजे असे आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते आपले मत व्यक्त करीत आहेत संघर्ष करावाच लागेल त्या शिवाय प्रश्न निकाली काढता येणार नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराला सोळा वर्षे लागली कायदा करून अंमलबजावणी करण्यासाठी हा इतिहास आहे. सन २००४ पासून हा प्रश्न निर्माण झाला आहे यालासुद्धा १७ वर्षे झाली आहेत तरी आता संघर्ष अटळ आहे यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असा इशारा खोरीपा चे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार मा. उपेंद्र शेंडे यांनी दिला आहे, अशी माहिती जीवन बागडे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्ष खोरीपा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week