मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्यमंञी उद्धव ठाकरे व अशोक चव्हाण यांनी मंञी पदाचा राजीनामा द्यावा - मराठा क्रांती ठोक मोर्चा !

मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्यमंञी उद्धव ठाकरे व अशोक चव्हाण यांनी मंञी पदाचा राजीनामा द्यावा - मराठा क्रांती ठोक मोर्चा !

     आंदोलनापुर्वीच मराठा आंदोलक पोलीसांच्या ताब्यात !

       मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने ठोस पाऊल न उचलल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाची दिशाभुल करत आहे. या निषेधार्थ आज दि.२४ मे रोजी सकाळी ११ वा. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक मंञालयात काळे झेंडे लाऊन सरकारचा निषेध करून मुख्यमंञी व मंञी मंडळाचे लक्ष वेधनार होते. माञ आंदोलनाच्या हालचालीची गोपनीय माहीत सुञाकडुन मुंबई पोलीसांना मिळाली होती.


      आंदोलनापुर्वीच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील, अप्पासाहेब कुढेकर, राहुल पाटील यांना पोलीसांनी छञपती शिवाजी महाराज टर्मीनस फलाट क्र.१८ जवळील एका हाँटल जवळ पोलीसांनी ताब्यात घेत अटक  केली. यावेळी पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम कँबिनेट मंञी तथा मराठा आरक्षण उपसमीतीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायलयात पाठपुरावा केला नाही त्यामुळेच मराठा आरक्षण रद्द झाले आहे. त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी लाऊन धरली होती. पोलीसांनी कितीही गुन्हे आमच्यावर दाखल करून दबाव आणुद्या माञ मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्यभर प्रत्येक मंञी, आमदार, खासदार यांच्या घरासमोर काळे झेंडे लाऊन निषेध करणार आहे एवढे करूनही सरकारने मराठा आरक्षणाची बाजु भक्कमपणे न मांडल्यास त्या झेंड्याचे दांडे घेऊन आम्ही लोकप्रतीनिधींच्या घरावर दंडुके मोर्चे काढणार आहोत. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही शांततेत व नियमांचे पालन करून आंदोलन करत आहोत. यापुढेही आंदोलन सुरूच राहणार आहे असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील व अप्पासाहेब कुढेकर, राहुल पाटील यांनी जाहिर केले. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे मुंबई येथे त्यांना अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले होते.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week