लोक कलाकारांना आर्थिक मदत करा अन्यथा ते आत्महत्या करतील - रमेश कांबळे !

लोक कलाकारांना आर्थिक मदत करा अन्यथा ते आत्महत्या करतील - रमेश कांबळे !

            कोरोनाच्या पहिल्या लाटेतून लोक सावरत असतानाच कोरोनाच्यां दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडून प्रचंड हाल सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने लोककलावंत मग तो तमासगीर असो वादक, गायक, कवी, भारुड कलाकार, लावणी गोंधळी, जोगती, नाटककार, ऑर्केस्ट्रावाले, उर्दू कव्वालीवाले, कवी.भीमगीतकार, संगीतकार असो अशा सर्वच गरीब कलावंतांचे प्रचंड हाल सुरू आहेत. किंबहुना त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कारण हे लोक कलावंत वर्षातील दोनच महिने महापुरुषांच्या जयंती निमित्त किंवा इतर धार्मिक कार्यक्रम करतात आणि दहा महिने बसून खातात. मागील कोरोनाच्या लाटेमुळे त्यांना गेल्या वर्षी चा सीजन करता आला नाही. त्याचप्रमाणे या वर्षीचाही सीजन त्यांना करता येणार नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि हे लॉक डाऊन असेच सुरू राहिले तर त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. हे विधान आहे माजी नगरसेवक रमेश कांबळे यांचे !

        रमेश कांबळे यांनी या आशयाचे पत्रही मुख्यमंत्र्यांना लिहिलेले आहे. त्याचप्रमाणे खासदार राहुल शेवाळे यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत लवकरच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर बैठक घेऊन श्री रमेश कांबळे हे मुख्यमंत्र्यांना संबोधित करताना महाराष्ट्रातील लोक कलावंतांची व्यथा मांडणार आहेत. त्यांची कशाप्रकारे हालअपेष्टा सुरू झाले आहेत याचा संपूर्ण पाढाच वाचून दाखवणार आहेत. आणि प्रत्येक गरीब लोककलावंतांना कोरोना महामारीच्या काळात तसेच लॉकडाउनच्या काळात प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week