लसीकरणाच्या दुस-या डोसची समस्या !!

लसीकरणाच्या दुस-या डोसची समस्या !!

        कोविड २०१९ चा समूळ नायनाट करण्यासाठी लसीकरणाची मोहिम आखण्यात आली. या लसीकरणामुळे होणा-या दृष्परिणामाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामान्य नागरिकांनी या मोहिमेला दिलेला प्रतिसाद पाहता मायबाप सरकार आपल्याला पूर्णपणे दिलासा देईल आणि जनजीवन पून्हा पूर्विप्रमाणे सुरळीत होईल. या हेतूने प्रेरित होऊन सामान्य नागरिकांची लसीकरण  केंद्रावर झूबंड उडाली.  

          पहिला डोस ब-याच जणांनी मायबाप सरकारच्या मिळालेल्या सूचनेनूसार मोफत प्राप्त करून मिळविला. दूसरा डोस शासनानी दिलेला कालावधी संपुष्टात येत आला तरी नागरिकांची लसीकरण केंद्रावर दुसरा डोस मिळविण्यासाठी पहाटे पासून रांगा लावूनही लस उपलब्ध होत नसल्यामुळे (पैसे देऊन उपलब्ध) नागरिक हतबल झाले आहेत. आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह पहिल्याप्रमाणे व्हावा यासाठी हातावर पोट असलेल्या लोकांना किती हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत असेल यांची जाणीव ठेऊन तिस-या लाटेची शव-यता लक्षात घेता. आधीच कोविड मुळे रोजगाराची संधी उपलब्ध नसलेल्या सामान्य नागरिक अजून भरडला जाणार नाही यांची जाण ठेवता, लसीकरण केंद्रावर लसीचा योग्य पुरवठा (दुसरा डोस) मोफत उपलब्ध करून, जनजीवन सुरळीत होईल याची दक्षता संबंधित यंत्रणा घेईल काय? 

----- सुनिल गोपाळ पांचाळ ----


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week