मिनरल वॉटर कंपनी करणार नागरिकांची मोफत रक्त तपासणी !

मिनरल वॉटर कंपनी करणार नागरिकांची मोफत रक्त तपासणी !

             ब्रिजल ऍग्रोफुड ब्रेव्ह रेज प्रायव्हेट लिमिटेड मिनरल वॉटर कंपनी गरजू गरजवंत आणि गरीब नागरिकांची मोफत रक्त तपासणी करणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक श्री मुकेश जैन यांनी दिली.          

              ब्रिजल ऍग्रोफूड ब्रेव्हरेज प्रा. लि. ही कंपनी मिनरल वॉटर व्यवसायात गेली वीस वर्ष आहे. दरवर्षी या कंपनीच्या फायद्यातील 59%  हिस्सा समाजसेवेसाठी देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी, मोफत औषधे, मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील आदिवासी पाड्यातून ही सुरुवात केली जाणार आहे. मोठमोठ्या रूग्णालयाप्रमाणे सरकारी रुग्णालयातही रक्त तपासणी करण्यासाठी पेशंट कडून पैसे आकारले जातात. रक्त तपासणी करता अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असल्याचा मला स्वतः अनुभव आलेला आहे. कारण माझ्या पत्नीची किडनी निकामी झाल्याने ती बरीच आजारी होती. तिला घेऊन मी मुंबई मधील मोठ्या रुग्णालयात गेलो होतो तिच्या आजारपणामुळे इतर खर्च तर खूप झाला परंतु रक्त तपासणीचा खर्च वारंवार करावा लागत होता. हे मला त्यावेळी निदर्शनात आले. दुर्दैवाने माझी पत्नी किडनी या आजारात मृत्यू पावली.

           त्यामुळे मी असे ठरवले की यापुढे गोरगरिबांची सेवा करणे व याच समाजसेवेचा एक भाग म्हणून मी ठाणे येथील वाडा तालुक्यात आदिवासी पाड्यात गरजवंत रुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी लॅब सुरू करणार आहे याचा लाभ कोणीही सामान्य नागरिक घेऊ शकतो असे, मुकेश कुमार जैन यांनी सांगितले.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week