अवैध प्रवासी वाहतूकदारांच्या बरोबरची बैठक रद्द केली !

अवैध प्रवासी वाहतूकदारांच्या बरोबरची बैठक रद्द केली !

          अवैध प्रवासी वाहतूकदारांना अधिकृत करण्याबाबत आज आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली आहे, अवैध प्रवासी वाहतूकदारांना अधिकृत करण्यासाठी आज अनिल परब यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती ह्या बैठकीला परिवहन आयुक्त, अतिरिक्त पोलिस महासंचालक, राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अशा महत्त्वाच्या अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते ही बाब लक्षात येताच आज सकाळी कास्टाईब रा प कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे यांनी, अवैध प्रवासी वाहतूकदारांना अधिकृत दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात येऊ नये अशी परिवहन मंत्री अनिल परब यांना विनंती केली व आमच्या विनंतीला मान देऊन व दिलेल्या बातम्यांची दखल घेऊन अनिल परब यांनी आज आयोजित केलेली बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला त्या बद्दल कास्टाईब रा प कर्मचारी संघटनेच्या वतीने सरचिटणीस सुनील निरभवणे यांनी मा ना एड अनिलजी परब यांचे आभार मानले आहेत व यापुढेही एस टी च्या हिताचा निर्णय घेण्यात यावा अशी विनंती केली आहे एस टी महामंडळाच्या माध्यमातून जवळपास २९ विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते.

      शाळा कौलेज नोकरी सरकारी कामकाज बाजार यात्रा जत्रा आदी विविध बाबींसाठी ग़ामीण महाराष्ट्रातील जनतेला एस टी च्या लालपरीवर अवलंबून राहावे लागत आहे एस टी ही ग़ामिण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते ही एस टी टिकवण्यासाठी राज्य सरकारने विचार करावा अवैध प्रवासी वाहतूकदारांच्या मुळे एस टी महामंडळास मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे लक्षात घेऊनच निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा आहे, एस टी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी राज्य सरकारने पथकर रद्द करावा, प़वाशी कर रद्द करावा, डिझेल खरेदी वरील अबकारी कर रद्द करावा अशी मागणी कास्टाईब रा प कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे यांनी केली आहे.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week