
रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र राज्यातील महानगर पालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय !
रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र राज्यातील महानगर पालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय !
नागपूर- प्रतिनिधी रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र राज्यातील होऊ घातलेल्या महानगर पालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय आज नागपुरात झालेल्या पक्षाच्या पार्लमेंटरी कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, रिपब्लिकन पक्ष खोरिप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्र शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, राज्य विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष खोरिपच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यानंतर भाजपच्या सोबत मैत्री करण्याबाबत चर्चा करण्यात आली असून पक्षाच्या पार्लमेंटरी कमिटीच्या बैठकीत यापुढे भाजपाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा असा विचार करून यापुढे राज्यात येणाऱ्या महानगर पालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे औरंगाबाद, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार ह्या महानगर पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत ह्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यासाठी ह्या महानगरात लवकरच मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
त्याच बरोबर बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त येत्या २५ व २६ सप्टेंबर २०२१ रोजी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यापुर्वी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी करण्यासाठी जिल्हानिहाय बैठका, मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत बैठकीला पक्षाचे उपाध्यक्ष मा देशक खोब्रागडे, सरचिटणीस प़ाचार्य डॉ गोपीचंद मेश्राम, संघटन सचिव मा उत्तमराव गवई, प़वक्ते मा डॉ एन व्हि ढोके, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा भाऊ निरभवणे, सरचिटणीस जीवन बागडे विदर्भ प्रदेश सरचिटणीस रमेशभाऊ कांबळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे यांनी दिली आहे.