
शिवडी वडाळा विधानसभा समस्यांना बाबत समाजसेवक शिवा चौहान यांनी घेतली राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट !
शिवडी वडाळा विधानसभा समस्यांना बाबत समाजसेवक शिवा चौहान यांनी घेतली राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट !
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता शिवडी वडाळा विधानसभा क्षेत्रातील विविध नागरी समस्यांबाबत राज्यमंत्री सतेज पाटील यांची स्थानीय समाजसेवक व माजी नगरसेवक शिवा चौहान भेट घेतली.
शिवडी वडाळा विभागातील नागरिकांना अनेक मूलभूत आणि नागरी समस्येला सामोरे जावे लागत आहे याबाबत नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. राज्यमंत्री सतेज पाटील साहेबांनी सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले .
शिवडी वार्ड मधील कोणाला काहीही समस्या असल्यास त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयास भेट द्यावी असे आवाहन शिवा चौहान यांनी केले आहे.