धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यामागे पंकजा मुंडे यांचा हात अजयसिंग शेगर यांची माहिती !
बलात्कार प्रकरणी चर्चेत असलेले भाजप नेते धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यामागे पंकजाताई मुंडे यांचा हात असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंग शेगर यांनी दिली.
धनंजय मुंडे यांचे प्रकरण १४ वर्षानंतर बाहेर आले हे प्रकरण इतक्या वर्षांनी बाहेर येण्यामागचं कारण काय तर याला एक राजकीय विरोध आहे तो म्हणजे पंकजाताई मुंडे, पंकजाताई मुंडे यांनीच धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठी हे षड्यंत्र रचलेले आहे. मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप लावलेला आहे ती व्यक्ति दुसरी कोणी नसुन धनंजय मुंडे यांच्या दुसरी पत्नीची बहिण आहे. दरम्यान मुस्लिमांना दुबर्या प्रतिबंधक कायदा लागू करावा जेणेकरून मुस्लिमांमध्ये तीन-चार लग्न केली जातात तर हिंदू मध्ये केवळ एकच लग्न केले जाते त्यामुळे यापुढे राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून घ्यावी.
राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव आहे त्यामुळे हिंदू धर्म यांना विभागीय प्रतिबंधक कायदा लागू होत नाही जर हिंदूंना कायदा लागू होणार असेल तर मुस्लिम धर्मीयांना देखील हा कायदा लागू करण्यात यावा, असेही अजय सिंग यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे ज्या महिला आपल्या स्त्रीधनाचा गैरवापर करून अशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करतात त्यांच्यावर सरकारने कठोरात कठोर पावले उचलून विशेष कायदा तयार करावा अशीही मागणी अजय सिंग शेगर केली आहे.