माजी उपजिल्हाधिकारी नथुराम गायकवाड यांचे निधन !

माजी उपजिल्हाधिकारी नथुराम गायकवाड यांचे निधन !

               काळुद्रें गाव ता. पनवेल निवासी रायगडचे सुपुत्र तथा सेवानिवृत्त निवड श्रेणीतील उपजिल्हाधिकारी नथुराम गोपाळ गायकवाड यांचे शुक्रवार दि.११ डिसेंबर २०२० रोजी पनवेल येथे राहत्या घरी वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

          नथुराम गायकवाड यांनी महाराष्ट्र शासना च्या महसूल विभागात ३८ वर्षे नोकरी करून ३१ जानेवारी २००५ रोजी मुंबई उपनगर उप जिल्हाधिकारी या पदातून सेवामुक्त होऊन निवृत्त झाले. त्यांना  शासकीय सेवेत  त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सन्मानपत्र व राज्यपालांचे गौरव चिन्ह व केंद्र शासनाकडून उत्कृष्ट कामगिरी बद्दल पारितोषिक देऊन गौरवान्वित करण्यात आले आहे. तसेच सेवानिवृतीनंतर मुंबई आणि  ठाण्याच्या विविध संघटना, मंडळां -तर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नथुराम यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुलोचना नथुराम गायकवाड,दोन मुलगे सुनील गायकवाड, अनिल गायकवाड, दोन मुली शैलजा सरवदे, रेखा कांबळे, जावई गुणशील सरवदे, रत्नदीप कांबळे, सुना सुजाता गायकवाड, शितल गायकवाड व  नातवंडे असा परिवार आहे. नथुराम गायकवाड यांचे निधनाने संपूर्ण गायकवाड कुटुंब व आप्तेष्ट शोकसागरात आहेत.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने