
अनोख्या उपक्रमाने सावित्रीबाई फुले जयंती साजरी !
अनोख्या उपक्रमाने सावित्रीबाई फुले जयंती साजरी !
औरंगाबाद : पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन डॉ. गोपाल बछिरे यांनी सावित्रीबाई फुले जयंती व भागीरथीआई भिकाजी बछिरे यांच्या ८७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून यादव नगर येथील बटरफ्लाय गार्डन मद्धे अरेका पाम नावाचे २४ तास ऑक्सिजन देणारी झाडे लावून तसेच २०० वीट भट्टी कामगारांना ब्लँकेटचे वाटप करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अरुणजी देऊळगावकर, श्रीरामजी काथार, हिम्मतरावजी काळे, साळुंके, कैलास पाटील साळवे, माणिकजी हीरेकर बागडे, साहेबराव ननावरे, रामदासजी माळनकर, महिंद्रकर सोबत दिलीप कोंडके, मोहन वैद्य प्रमोद बक्षी, रमेशजी विठोरे, गजानन विधाते, केशवराव मालोदे, विलासराव ढेकळे, शेख सईद सय्यद सर, विकास चौधरी, सुरेश जाधव, सौ. रंजना बछिरे, सुनीतताई काकडे, संगीताताई भाकरे, शोभाताई सोनुने, वृंदा भाकरे जाधव ताई, भोगावकर ताई, बक्षी ताई, हिरेकर ताई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.