पत्नीचा खून करून पळून गेलेल्या आरोपीस उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या !!

पत्नीचा खून करून पळून गेलेल्या आरोपीस उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या !!

नालासोपारा, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील तुळशी भवन, बावशेत, येथील कारगिल टेकडी द्वारका चाळ येथील महिला रेहाना वय वर्ष ३५ हिचा दुसरा नवरा जब्बार सय्यद याचे सोबत तिचा पहिला नवरा याच्यापासून झालेला एक मुलगा व मुलीसह सदर ठिकाणी राहत होती. तिचा मोठा मुलगा हारुल अन्वर खान हा गाळा नगर, नालासोपारा येथे कारखान्यात जरीचं काम करून त्याच ठिकाणी मित्रांसह राहत होता. तो अधून मधून आई व आपल्या भावंडांना भेटण्याकरता वरील ठिकाणी येत होता. त्यामुळे त्याचे सावत्र वडील जवाद जब्बार याला राग येत होता. त्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते.


     दिनांक २२/५/२०११ रोजी मोहम्मद हारून खान हा त्याची आई रेहाना व भावंडे यांना भेटायला आला होता व यांच्यासह वरील ठिकाणी मुक्काम केल्याने दिनांक २३/५/२०११ रोजी जवाद जब्बार सय्यद यांच्यात वाद होऊन रात्री पत्नी झोपेत असताना तिच्या डोक्यात मोठा दगड घालून तिला जीवे ठार मारले. म्हणून मुलगा मोहम्मद हारून अन्वर खान याने दिलेल्या फिर्यादीवरून नालासोपारा पोलीस ठाणे येथून गुन्हा रजिस्टर क्रमांक भारतीय दंड विधान  कलम ३०२ या अनुषंगाने खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा नोंदविल्या पासून आरोपी जब्बार सय्यद हा फरार झाला होता. गेल्या पंधरा वर्षापासून पोलिसांना चकमा देऊन तो आपल्या मूळ गावी उन्नाव उत्तर प्रदेश येथे लपून बसला होता.


      माननीय पोलीस आयुक्त गुन्हे व माननीय सहायक पोलिस आयुक्त गुन्हे यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने गुन्हा उघडकिस आणणे साठी आदेश दिले, वरील आरोपीचा शोध घेत असताना पंधरा वर्षापासून तो मिळून येत नव्हता त्या अनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, सहाय्यक पोलीस फौजदार आसिफ मुल्ला, पोलीस हवलदार संग्राम गायकवाड, महेश वेल्हे, शिवाजी पाटील, गोविंद केंद्र, हनुमंत सूर्यवंशी असे तपास पथक तयार केले होते. 


       नमूद पोलीस पथकाने नालासोपारा येथील पोलीस ठाणे येथील माहिती घेऊन आरोपी जवाद जब्बार सय्यद याची एक महिन्यापासून सतत अहोरात्र मेहनत घेऊन सखोल माहिती घेतली असता, आरोपी जवाद जब्बार सय्यद हा त्याचे मूळ गाव लखनऊ उत्तर प्रदेश येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. त्वरित तपास पथक हे उत्तर प्रदेश येथे रवाना होऊन तांत्रिक विश्लेषणा द्वारे आरोपीची माहिती मिळवून घेतली आणि स्पेशल टाक्स फौज व लखनऊ उत्तर प्रदेश येथील पोलीस ठाण्याची मदत घेऊन सापळा रचला व आरोपी जवाद ह्यास ग्राम रोहाई खुर्द, पोस्ट हैदराबाद जिल्हा उन्नाव, उत्तर प्रदेश येथून दिनांक २५/१/०२५ रोजी ताब्यात घेतले.


     सदरची कारवाई ही माननीय पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री.अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय श्री मदन बल्लाळ यांच्या आदेशावरून माननीय पोलीस प्रभारी पोलीस निरीक्षक श्री अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय सरक, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नितीन बेंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री श्रीमंत जेधे, श्री. मनोहर तावरे, श्री. आसिफ मुल्ला, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, महेश वेल्हे, हनुमंत सूर्यवंशी, राजाराम काळे, संतोष मदने, संग्राम सिंग गायकवाड, प्रवीणराज पवार, गोविंद केंद्रे, पोलीस शिपाई नितीन राठोड ,अंगद मुळे, अखिल सुतार, सचिन चौधरी, सहायक फौजदार संतोष चव्हाण व मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week