
गोरेगाव नागरी निवारा संकुलात भव्य आरोग्य शिबीर संपन्न !
गोरेगाव नागरी निवारा संकुलात भव्य आरोग्य शिबीर संपन्न !
मुंबई : गोरेगाव पूर्व येथे नागरी निवारा संकुलात, विसावा नागरी निवारा ज्येष्ठ नागरिक संघ व लायन्स क्लब ऑफ गोकुळघाम - यशोधाम यांच्या संयुक्त विद्यमाने एन एम पी प्लॉट नंबर ६ विसावा नागरी निवारा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या कार्यालयात, विनामूल्य आरोग्य शिबीर संपन्न झाले.
शिबिराचे उदघाटन, दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक - प्रल्हाद घाडीगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. तद प्रसंगी नागरी निवारा ट्रस्टचे - बाळकृष्ण हळदणकर, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष - हिंदुराव वाडते सह शैलजा बोन्द्रे, रमेश शेलार, सोनू वारंग, रोहिदास बुद्धिवंत तसेच लायन्स क्लबचे लायन- संजय कर्णिक, लीना कर्णिक, संदीप राजपुरकर व डॉ. गायत्री पांडव उपस्थित होते.
शिबिरात स्तन कर्करोग तपासणी, दंत तपासणी, रक्त दाब, रक्तातील शुगर, हाडाची क्षमता, त्वचा रोग आदीची विनामूल्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.
विसावा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने उपस्थित मान्यवराचा सन्मान करण्यात आला. डॉ गायत्री पांडव यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
शिबिरात १६१ नागरिकांनी उपस्थित राहून तपासणी करून घेतली. आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी रामचंद्र राऊत, रघुनाथ चव्हाण, बबन बोले व भगवान गरुडे यांनी मेहनत घेतली होती.