
मुंबई कोणाची फेरीवाल्यांची ?
मुंबई महापालिका निवडणूक लवकरच जाहीर होणार असून, मुंबईचा महापौर आमचाच, अशा घोषणा दिल्या जात आहेत. परंतु मुंबई नेमकी कोणाची, मराठी माणसांची? की अनधिकृत फेरीवाले, खाद्य पदार्थ गाडी वाल्यांची. मुंबईत तीस पस्तीस वर्षापूर्वी वडापावच्या गाड्या पाहावयास मिळत. आता त्याची जागा इतर प्रांतातून आलेल्या मंडळींनी घेतली आहे. खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर चायनीज पदार्थ मिळत आहेत. सर्व रेल्वे स्टेशनच्या १५० मी परिसरात धंदा करण्यास मनाई आहे. असा न्यायालयाने निर्णय दिलेला आहे.
अशा या फेरीवाल्यांनी हाथ गाडीवाले यांनी व्यापलेल्या फुटपाथ वरुन रस्त्यावरून सर्व सामान्य मुंबईकरांना चालावे लागते. एका जनहित याचिके तर्फे हायकोर्टाने फेरीवाले जुमानत नाहीत हे मान्य करा. महापालिकेसह राज्य शासनाला सुनावले आहे. पालिका आणि पोलीस जबाबदारी झटकत असल्याचे पहावयास मिळते. असे परखड मत मांडले असताना अशी मुंबई कोणाची? हा प्रश्न येत्या महापालिका निवडणुकीत असणार आहे. याचा सर्व पक्षांनी विचार करणे आवश्यक आहे.