प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदनामी करण्याच्या हेतूने काढली शिमग्याची सोंग !!

प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदनामी करण्याच्या हेतूने काढली शिमग्याची सोंग !!

      आपण लहानपणी मायापुरी हे मासिक वाचले आहे. होळी आली की त्यात हीरो हीरोइनच्या फोटोंची शिमग्यांची सोंग काढलेले फोटो असत. त्यावेळेस मजा वाटायची बघायला बाईचे शरीर, पुरुषाचा चेहरा, गंमत वाटत असे पण ते फोटो अश्लील कोणत्याच प्रकारे नसायचे.


        कदाचित हेच डोक्यात ठेवून प्रशासनाच्या ढिल्या कारभाराचा राग एका आरोपीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शिमग्याची सोंग काढून अधिकाऱ्यांची बदनामी करून खंडणी मागण्या करता केला.


       घटना अशी की दिनांक १८/११/२४ व दिनांक ८/१२/२४ रोजी एका अज्ञात आरोपीने वसई विरार महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फोटोतील चेहरा हा एका न्यूड साइटवरील स्त्री, फोटोवर स्त्रीच्या जागी अधिकाऱ्यांचे फोटो चिटकवून मार्क करून सदरचा फोटो संबंधित अधिकारी यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर प्रसारित केला. तसेच संबंधित अधिकारी यांना सुद्धा त्यांच्या परिवारातील सदस्यांची ही बदनामी करण्याची धमकी दिली. बोळिंज पोलीस पोलीस ठाणे तालुका वसई येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४/२०२४ भारतीय न्याय संविधान. कलम ३५१, (२) ३५६ (२) सह माहिती तंत्रज्ञान अधिक्रम ६६ सी ६७ अन्वये गुन्हाची नोंद करण्यात आली.


       सदरच्या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना केली होती. त्याचप्रमाणे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त (गुन्हे), माननीय सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) यांनी दिलेल्या सूचना व आदेशाचे पालन करून तसेच तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चंदन सूर्यभान सिंह, उर्फ चंदन ठाकूर वय वर्ष 32 राहणार जे एवेन्यू रूम नंबर ५०४ ग्लोबल सिटी विरार पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर याला दिनांक १८/२/२०२५ रोजी ताब्यात घेण्यात आले. असून आरोपी चंदन ठाकूर याचेवर. बोळींज पोलीस ठाणे, भाईंदर पोलीस ठाणे, मिरा रोड पोलीस ठाणे, अशा प्रकारे एकूण पाच पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे, तसेच नवघर पोलीस ठाणे येथे पाच व मीरा भाईंदर येथे दोन असे गुन्हे दाखल आहेत.


          वरील आरोपीस पुढील कारवाई करिता बोलून पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक भारतीय न्याय संविधान कलम ३५१,(२) ३५६ (२) सह माहिती तंत्रज्ञान अशा आधारे गुन्ह्यात हजर करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा तपास बोळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रकाश सावंत हे करीत आहेत. 

         वरील कामगिरी श्री मधुकर पाण्डेय पोलीस आयुक्त, श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, श्री अविनाश अंबुरे पोलीस उपायुक्त(गुन्हे), श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजित कुमार गुंजकर, सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बावरकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पोलिस अंमलदार राकेश पवार, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, अतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तरडे, प्रवीण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे, सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन यांनी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल व्हावळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोलकर, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सहाय्यक फौजदार मिलाग्रीस फर्नांडिस, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, महिला पोलीस अमलदार सुवर्णा माळी, स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार शुभम कांबळे, कुमार सावळे, विलास खाटीक, राहूल बन, सावन शेवाळे, सर्व नेम सायबर पोलीस ठाणे यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week