
अर्थ संकल्पात पेन्शनर दुर्लक्षित !!
अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी मध्यम वर्गीयांना बारा लाख रु. पर्यंत इन्कम टॅक्स माफ केला त्याबद्दल धन्यवाद. परंतू खासगी क्षेत्रातील इ पी एस १९९५ च्या पेन्शनरांच्या पेंशनवाढीचा प्रश्न गेले अकरा वर्ष अनिर्णित आहे.
पेंशनचे मोल पैशात नसून म्हातारपणात असणारी काठी आहे. कामगार आणि व्यवस्थापन यांचे योगदान आहे. कष्टकरी कामगार यांचे हाथ राबवलेले असतात. पेंशन वाढ करता, पेंशन संघटना दिल्ली पर्यंत आंदोलन करत आहेत. कित्येक खासदार संसदेत मागणी करत आहेत. प्रत्यक्ष पंत प्रधानांची भेट घेतलेली आहे. त्याचप्रमाणे अर्थ संकल्पा पूर्वी पेन्शनर संघटना पदाधिकाऱ्यांनी अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेतली होती. न्यायालयाने निर्णय देऊन ही आयुष्यमान भारत प्रमाणे पेंशनवाढ व्हावी होती. परंतु दुर्दैवाने अर्थ संकल्पात पूर्ण दुर्लक्षित झाली आहे. हे ज्येष्ठ नागरिकांचे दुर्दैव आहे.