ए चल माल निकाल.....

     महालक्ष्मी मुंबई रिषभ ज्वेलर्स येथे दोन इसमानी चाकू सुऱ्याचा धाक दाखवून दरोडा घातला, सोन्या-चांदीचे दागिने केले लंपास...

     

       सोन्या चांदीच्या दुकानात प्रवेश करून बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून केली जबरी चोरी !!

        दिनांक २९/१२/२४ रोजी आग्रीपाडा पोलीस ठाणे हद्दीतील रिषभ ज्वेलर्स, लक्ष्मीदास वाडी, साने गुरुजी मार्ग, सात रस्ता महालक्ष्मी मुंबई येथे दुपारी तीनच्या दरम्यान दोन अनोळखी इसमानी सोन्याच्या दुकानात घुसून चाकू बंदुकीचा धाक दाखवून सदर दुकानाचे मालक श्री भवरलाल जैन वय वर्ष ५० तसेच दुकानात काम करणारा त्यांचा नोकर पुरणकुमार ओबाराम देसाई वय वर्ष १९ ह्या दोघांचे हातपाय बांधून व धमकावून दुकानातील अंदाजे २४५८ ग्रॅम सोन्याचे विविध दागिने, तसेच २२०० ग्रॅम वजनाचे विविध चांदीचे दागिने व रोख रक्कम १५००० अशी मालमत्ता जबरी चोरी करून निघून गेले.

        म्हणून फिर्यादी दुकानाचे मालक श्री भवरलाल जैन यांनी आग्रीपाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली.


नमूद गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीच्या तपासाकरिता माननीय सत्यनारायण चौधरी पोलीस सह आयुक्त, माननीय अनिल पारसकर अप्पर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग मुंबई, माननीय दत्तात्रय कांबळे परिमंडळ ३ मुंबई यांनी मध्य प्रादेशिक विभागातील सर्व तपासी पथकांना मार्गदर्शन करून विविध ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने व तांत्रिक माहितीच्या विश्लेषणाद्वारे तपासाचे आदेश दिले. 


         वरिष्ठांच्या आदेशा वरून आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय निंबाळकर, तपास अधिकारी श्री संदीप फणसे यांनी तपास पथका सोबत सतत ७२ तास पाठपुरावा केला असता सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपीच्या संभाषणावरून आरोपी हे कोणत्या प्रदेशातील आहेत याबाबत माहिती प्राप्त केली.


तसेच घटनास्थळावरून आरोपींची फिंगर प्रिंट व गुन्ह्यात पाहिजे असलेला संशयित आरोपी याची माहिती प्राप्त झाली. तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपी हे उत्तर प्रदेश येथील झाशी या राज्यात चीरगाव येथे लपून बसल्याची खात्रीसर माहिती प्राप्त झाली.


चौकशी करता राजस्थान येथे रवाना झालेल्या पथकास उत्तर प्रदेश येथे बोलावून घेऊन तपास करून संशयित आरोपी यांना स्थानिक पोलीस ठाणे शिरगाव येथे अटक करण्यात आली.


संशयित आरोपी संजीव कुमार लालता प्रसाद बुलकिया वय वर्ष २६ याच्याकडे चौकशी केली असता तो कटरा, समथर, झाशी, उत्तर प्रदेश येथील मूळ रहिवासी असल्याचे सांगून तो गेले सहा वर्षापासून मुंब्रा येथे दिवा पूर्व ठाणे येथे राहत होता व उपजीविकेसाठी दारोदारी फिरून काचेच्या बांगड्या विकण्याचा व्यवसाय करत होता. एका गुन्ह्यात झाशी जेलमध्ये असताना आरोपी विनोद लखन पाल याची ओळख व नंतर मैत्री झाली. जामीनावर बाहेर असताना, बांगडी विक्री व्यवसायाच्या बहाण्याने सात रस्ता येथील रिषभ ज्वेलर्स च्या दुकानावर पाळत ठेवत असे, रविवारी सुट्टीच्या दिवशी रिषभ ज्वेलर्स येथे वर्दळ कमी असते व दुपारी मालक व नोकर हे दोघेजण दुकानात असतात ही माहिती त्याने काढली व आपला मित्र विनोद लाखन पाल याने रिषभ ज्वेलर्सचे दुकान लुटण्याची योजना आखली व लुटी साठी लागणारे बंदूक चाकू इत्यादी साहित्य तो आपल्या मूळ गावी जाऊन घेऊन आला.


       त्यानंतर रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी त्याने आपला साथीदार विनोद लाखनपाल यांच्या मदतीने दुकान लुटून मूळ गावी पळून आल्याचे सांगितले. शोध पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक २/१/२५ रोजी आरोपी विनोद लाखन पाल याला आग्रीपाडा पोलीस ठाणे यांनी अटक केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली बंदूक व काही सोन्याचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले. आरोपी संतोष कुमार लालता प्रसाद बुल्लकिया वय वर्ष २५ व विनोद लाखन पाल वय वर्ष २६ या दोघांवर उत्तर प्रदेश येथील पोलीस ठाण्यात येथे विविध गुन्ह्याची नोंद आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केल्यावर आगरी पोलीस ठाणे येथे आरोपी संतोष कुमार लालता प्रसाद बनक्या व विनोद लाखनपाल यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०९(४), ३०९(६), ३३३,१२७,३११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


     सदरची कामगिरी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी श्री नवनाथ चौधरी, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर, आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रविकांत नंदनवार, श्री अजय भोसले, श्री दत्तात्रय गुरव, श्री प्रकाश सुतार, श्री सचिन माने, श्री जोष्टे, पोलीस उपनिरीक्षक श्री उमेश करंजावणे, श्री स्वप्निल कोंडे, श्री प्रकाश काळे, श्रीमती प्रतिभा पवार, श्री पाटील, श्री घाग, श्री काकळीज, श्री खैरावर, श्री पायघन, श्री संजय कुमार कांबळी, तसेच पोलीस हवालदार अविनाश चव्हाण, मोरे, फड, पोलीस शिपाई केदार, नासिर शेख, शिंदे, रणदिवे बोरसे, अपसुंदे, समीर खरात, दिवटे, महिला पोलीस शिपाई देसाई, इंदलकर यांनी पार पाडली.


       


Batmikar
कार्यकारी संपादक - प्रीती तिवारी