लायन्स क्लब आणि पोलिसांची रस्ते सुरक्षेसाठी भव्य रॅली....
लायन्स क्लब आणि पोलिसांची रस्ते सुरक्षेसाठी भव्य रॅली....
लायन्स इंटरनॅशनल, डिस्ट्रिक्ट 3231A3, ग्रामीण सेवा सप्ताहाच्या अंतर्गत ट्रॅफिक आणि रस्ते सुरक्षे विषयी जागरूकतेसाठी, मीरा भायंदर आयुक्तालयाच्या वसई विरारच्या ट्रॅफिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे, त्यातच चालकांचा निष्काळजीपणा व ट्रॅफिकचे नियम न पाळल्याने होणारे अपघातांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अपघातामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात व पोलीस खात्यावर व समाजावर पडणारा ताण वाढतो तो वेगळाच.
या दृष्टीने विचार करून सामाजिक क्षेत्रामध्ये सेवेमध्ये अव्वल असणारी जागतिक सर्वात मोठे संघटना डिस्ट्रिक्ट ३२३१अ३ च्या वतीने व मीरा-भाईंदर आयुक्तालयाच्या वसई विरार विभागाने संयुक्तरीत्या एक जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या यादीमध्ये अनेक संस्थांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये एनएसएसचे स्टुडन्ट सदस्य राष्ट्रीय सैनिक संस्थेचे सदस्य व तसेच अनेक संस्थांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
ट्रफिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश शेट्ये यांच्या विशेष सहयोगाने व डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन राहुल रस्तोगी व लायन श्रद्धा मोरे, जि स टी हेड लायन प्रीती सोढा, इतर लायन मेंबर्स लायन हनुमंत भोसले, भावेश धनेचा, भारती पवार, अतुल दांडेकर, नितीन पुरकर, निनाद म्हात्रे, शिल्पी रस्तोगी, दीपक बडगुजर, डॉ. सोमनाथ विभुते, सुनील लावटी, मानस विभुते यांनी विशेष मेहनत घेऊन भव्य ट्रॅफिक रॅलीचे यशस्वी आयोजन केले.
यात डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन सरस्वती संकर, माजी प्रांतपाल लायन डॉ प्रशांत पाटील व माजी प्रांतपाल लायन हेमंतराज सेठीया, प्रथम उप प्रांतपाल मनोज बाबूर, द्वितीय उप प्रांतपाल नटवर बांका, विकास सराफ, उर्वी रजिस्ट्रर, डॉ. प्रवीण छाजड व अनेक लायन सदस्य सामील झाले. यात ट्रॅफिक विषयी बोध वाक्य, घोषणाचे फलक घेऊन NSS, NCC, न्यू इंग्लिश स्कूलचे बँड पथक, सेंट जेम्स हायस्कूल, आगाशीचे लेझीम पथक, साई प्रेरणा वस्ती स्तर बचत गटाच्या महिला, विविध लायन्स क्लबचे अध्यक्ष, लायन शिवा डोंगरे, रंजना म्हात्रे, दयानंद मानकर, कल्पेश शाह, सौ वर्षा मोदगेकर, नागर गहलोत यांनी रॅलीचा बॅनर घेऊन दीड किलोमीटरची वाटचाल केली ज्यात जवळ जवळ 250 लोकांनी सहभाग घेतला, यात ट्रॅफिक पोलीस, अनेक लायन मेंबर्स सामील होते. राष्ट्रीय सैनिक संस्थेचे मुंबई प्रदेशचे पदाधिकरी यात मार्गदर्शन करीत होते.
ह्या रॅलीची सांगता स्टेला पेट्रोल पंपच्या मागे, ड्रीम अरेना बँकवेट हॉल मध्ये झाली, तिथे ट्रॅफिक पोलीसासाठी विनामूल्य आरोग्य तपासणीचे आयोजित केले होते. मेडिब्रेन सोशल फौंडेशन ह्या वैद्यकीय सेवा संस्थेने सुट्टीची परवा न करता दिवस रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी ड्युटी करणाऱ्या पोलिसांची मोफत मधुमेह, पूर्ण नेत्र तपासणी, इ सी जी, फुफ्फुस, रक्तदाब, जनरल तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या.
150 च्या वर पोलीस कर्मचाऱ्यांनी या तपासणीचा लाभ घेतला. डीसीपी सौ पूर्णिमा चौगुले मॅडम यांनी त्यांच्या भाषणातून अनेक विषयाची माहिती दिली व उत्तम मार्गदर्शन केले. त्यांनी लायन्स क्लबची अनेक कार्यामध्ये मदत होत असल्याबद्दल लायन्स ग्रुपचे आभार मानले, रॅलीतील मुलांना लायन्स क्लबच्या गुडी बॅगेतून अल्पोपहार देण्यात आला.
माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दहिफळे व वसई पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री बाळकृष्ण घाडीगावकर व इतर मान्यवर लायन्स लीडर्स सोबत मंचावर उपस्थित होते.