
नेरळ येथील रहिवाश्यांच्या आरोग्याची काळजी !!
स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स परिसराची स्वच्छता मोहीम (परिसरात रान वाढले) राबवून रहिवाश्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत.
श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स ही वास्तू ग्रामपंचायत ममदापूर, नेरळ यांच्या हद्दीत नव्याने विकसित होत आहे. अ-ब विभाग डोलात उभारला जाऊन, त्याच्यात रहिवाश्यांची लगबग पाहण्यास मिळत आहे. मुंबई स्वप्नगरीत, स्वतःच एक टूमदार घर असावं, या जाणीवेतून परवडणारे घर म्हणून या कॉम्प्लेक्स कडे पाहिले जाते.
डेवलपर्समार्फत रहिवाश्यांकडून मेनटेनस् स्विकारण्यात येतो. ग्रामपंचायती कडून रहिवाश्यांकडे घरपट्टी कर, दिवाबत्ती कर, आरोग्य कर, पाणीपुरवठा बिलाची मागणी केली जाते. रहिवाश्यांकडून त्याचा भरणाही केला जात असून; सुविधांचा मात्र ठावठिकाणा दिसत नाही. सभोवतालच्या वाढलेल्या रानटी रानामुळे, तसेच साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे आरोग्य धोव-यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसराची वेळीच स्वच्छता होत नसल्यामुळे रानटी रानाची उंची तळमजल्यावरील घरात डोकावत असून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. पाण्याच्या साठलेल्या डबक्या मुळे तसेच वाढलेल्या रानटी रानामुळे सरपटणा-या प्राण्यांचा वावर या रहिवाश्यांनी अनुभवला असून, लहान-थोर मंडळी भीतीच्या सावटाखाली वास्तव्य करीत आहेत.
दि. २६ जानेवारी, २०२५ गणराज् दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स परिसराची स्वच्छता मोहीम [परिसरात रान वाढले] राबवून रहिवाश्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच; एक झाड आईच्या नावावर, मा. पंतप्रधान यांच्या उपक्रमा अंतर्गत परिसराचे सुशोभिकरण करून, झालेल्या कामाच्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारल्यास परिसर स्वच्छ-सुंदर-सुशोभित होऊन निरोगी-सुदृढ राहणीमानासाठी संबंधितानी हातभार लावावा.
सुनिल गोपाळ पांचाळ (लालबाग)