अग्निशस्त्राने गोळ्या झाडून खून करणाऱ्या दोन आरोपींना काशिमिरा पोलीस ठाणे यांनी ठोकल्या बेड्या.!!
गोळीबार करून खून करणाऱ्या दोन आरोपीतांस २४ तासाचे आत केली अटक.....
दिनांक ३/१/२५ रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास शांती शॉपिंग सेंटर मधील मीरामणी हॉटेलवर जाण्यासाठी असलेल्या जिन्याजवळ एका बंद दुकानाच्या सिमेंटच्या ओट्यावर ह्या गुन्ह्यातील प्रत्यक्ष साक्षीदार श्री उमर रमजान सोळंकी व यातील मयत इसम श्री श्यम्स तरबेज शहाबुद्दीन अन्सारी उर्फ सोनू हे दोघे गप्पा मारत असताना, यातील मयत शम्स तरबेज शहाबुद्दीन अन्सारी उर्फ सोनू व आरोपी नामे मोहम्मद युसुफ मन्सूरआली आलम राहणार बँक रोड, मिरा रोड, यांच्यात पूर्व वैमनस्यावरून वादविवाद झाला होता त्यामुळे आरोपीने कट रचून आरोपी क्रमांक एक याचे करवी त्याच्या डोक्यात डाव्या बाजूस पिस्टल ने फायर केली. आणि पळून गेला.
फिर्यादी इसम इब्राहिम शेख वय वर्ष २६ राहणार उत्तन डोंगरी भाईंदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या गुन्ह्यातील आरोपी सैफअली मन्सूरअली खान राहणार नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथून दिनांक ४/१/२५ रोजी ताब्यात घेण्यात आले.
आरोपीने दिलेल्या निवेदनावरून गुन्ह्यात वापरण्यात येणारे गावठी बनावटीचे एक पिस्टल मॅकझीन व सहा बुलेट हस्तगत करण्यात आल्या.
सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद युसुफ मन्सूरअली आलम वय वर्ष ३४ व्यवसाय व्यापार नयानगर, मिरा रोड पूर्व याला सदर गुन्ह्यात सहभाग असल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मा. अतिरिक्त श्री मधुकर पाण्डेय, मीरा भाईंदर वसई विरार अतिरिक्त आयुक्त मा. श्री दत्तात्रय शिंदे तसेच
श्री अविनाश अंबुरे पोलीस उपायुक्त गुन्हे, मा. श्री मदन बल्लाळ सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 1 काशिमिरा येथील सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक श्री अविराज कुराडे, श्री गांगुर्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, राजू तांबे, पोलीस हवालदार अविनाश गरजे, सचिन सावंत, समीर यादव, सुधीर खोत, विकास राजपूत, पोलीस शिपाई सनी सूर्यवंशी, धीरज मेंगाणें, म.सुभेदार किरण असवले, तसेच गुन्हे शाखा दोन वसईचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गीते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय नवले, रमेश भोसले, पोलीस हवालदार रमेश आलदर, अमोल कोरे, दादा आडके, सुधीर नरळे , पोलीस प्रफुल पटेल, पोलीस हवालदार रवींद्र पवार, सचिन पाटील, जगदीश गोवारी, पोलीस नाईक प्रशांत ठाकूर, पोलीस शिपाई राज गायकवाड, अजित मेंड, प्रतीक गोडसे, अविनाश चौधरी, रामेश्वर केकान, तसेच संतोष चव्हाण व सायबर गुन्हे शाखा यांनी केली.