
बाळासाहेब थोरात मराठा द्रोही, औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध !
बाळासाहेब थोरात मराठा द्रोही, औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध !
औरंगाबाद शहराचे नामांतर हे संभाजीनगर करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेला विरोध हा मराठा द्रोही असून त्यांचा मराठा समाज जाहीर निषेध करीत आहे, अशी माहिती शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक अंकुश कदम यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे यात अनेक मराठा समाजाचे नेते आहेत परंतु हेच नेते मराठा आरक्षणाला कायम विरोध करताना दिसतात त्यात प्रथम आघाडीवर असलेले राज्याचे काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण असून त्यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या विरोधातच भूमिका घेतली आहे राज्यातील मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती येण्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चा मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या तज्ज्ञांबरोबर चर्चा करण्यासाठी सल्ला देऊनही दुर्लक्ष करण्यात आले.
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यासाठी संपूर्णपणे अशोक चव्हाण जबाबदार आहेत. आरक्षणाच्या महत्त्वाच्या केसला सुप्रीम कोर्टामध्ये वकील न पाठविणे वकिलांना कागदपत्री पुरवठा न करणे आरक्षणाच्या प्रत्येक मिटींगला वेगवेगळ्या लोकांना बोलावून समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे आणि मराठा क्रांती मोर्चा मध्ये फूट पाडण्याचे काम अशोकराव चव्हाण करीत आहेत, असे अंकुश कदम यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मराठा आरक्षण बाबत जो शब्द दिला होता तो पाळत नाहीत आपला शब्द फिरवला आहे त्यामुळे निदान औरंगाबाद शहराचे नामांतरण हे संभाजीनगर करण्यासाठी तरी त्यांनी विरोध करू नये असेही अंकुश कदम यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणातून आम्हाला आरक्षण द्यावे अशी आमची मागणी असून या मागणीसाठी सातत्याने सरकार दरबारी आमचा पाठपुरावा सुरू आहे परंतु मराठा दोन्ही काँग्रेस नेत्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत असून या सरकारचे ज्येष्ठ मंत्री विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे वेळोवेळी विविध मराठा विरोधी वक्तव्य करून मराठा समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत हे त्या काळातील नेत्यांचा मराठा समाज योग्य समाचार घेणार असल्याचे अंकुश कदम यांनी सांगितले.