नगरसेविकेच्या पतीकडून धारावीतील समाजसेवकाला धमक्या !
नगरसेविकेच्या पतीकडून धारावीतील समाजसेवकाला धमक्या !
अनधिकृत बांधकामाची तक्रार करणाऱ्या समाजसेवकाला नगरसेविकेच्या पतीकडून धमकावण्यात आले आहे. धारावी येथील एका नगरसेविकेच्या पतीने समाजसेवक चंद्रशेखर स्वामी यांना भर रस्त्यात धमकावले. धारावीत सुरू असलेले अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडावीत याबाबतची तक्रार पालिकेकडे चंद्रशेखर स्वामी यांनी केली होती. परंतु बांधकाम पाडण्याची तक्रार दिल्याबद्दल मला नगरसेविकेच्या पतीकडून धमकावले जात असल्याची माहिती श्री. चंद्रशेखर स्वामी यांनी दिली.
यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दिली असून लवकरात लवकर सदर नगरसेविकेच्या पतीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री. चंद्रशेखर स्वामी यांनी दिली. तर यासंदर्भात ते लवकरच आझाद मैदान येथे उपोषण करणार आहेत असेही त्यांनी सांगितले.