सावित्रीजोती मालिका बंद करू नका ~ ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन !

सावित्रीजोती मालिका बंद करू नका ~ ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन !

        सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या सावित्रीजोती ही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिका बंद करू नये अशी विनंती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. तसेच या मालिकेच्या निर्मितीसाठी चित्रपटाप्रमाणे अनुदान देण्याबाबत विचार करावा, अशी विनंती ही त्यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमूख यांना या विषयावर लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

       टीआरपी न मिळाल्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय या वाहिनीने घेतला असल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्र म्हणजे फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी ओळख आहे आणि तरीही महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित टिव्ही मालिका अपेक्षित दर्शक संख्या मिळत नसल्याने निर्मात्यांना बंद करावी लागतेय हे  वृत्त सर्वच पुरोगामी संवेदनशील लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे. ही मालिका बंद झाल्यास महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत कसा पोहचणार ? त्यामुळे जनतेनी ही मालिका आवर्जून पहावी, असे आवाहन त्यांनी केले.

       तसेच ही मालिका चालू ठेवण्याची  विनंतीही त्यांनी सोनी मराठी आणि मालिकेच्या निर्मात्याला विनंती केली आहे. चित्रपटाच्या धर्तीवर या मालिकेला अनुदान देण्याबाबत विचार करावा, अशी विनंती त्यांनी सांस्कृतिक मंत्री देशमुख यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week