९ महिन्याच्या प्रतिक्षेनंतर मुंबईतील पहिले नाट्य गृह सुरू होणार !

९ महिन्याच्या प्रतिक्षेनंतर मुंबईतील पहिले नाट्य गृह सुरू होणार !

     नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दामोदर नाट्यगृह हे मुंबईतील पहिले नाट्यग्रह सुरू करण्यात आलेले आहे. दामोदर नाट्य गृह    (परेल) येथे पहिला प्रयोग शुक्रवार  २५ डिसेंम्बर (नाताळ सुट्टी) दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.


       २३ सप्टेंबर २०२० ला मुंबईत तुफान पाऊस पडला आणि परेल येथील दामोदर हॉल येथे पाणी भरले आणि त्यामुळे खूप नुकसान झाले होते, तरीही दामोदर हॉल चे संचालक मंडळ आणि दामोदर हॉलची पूर्ण आजी माजी व्यवस्थापक टीम यांनी ताबडतोब युद्ध पातळीवर काम करून नाट्य गृह छान तयार केले व सरकारच्या आदेशाची वाट पाहत होते. आणि ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनी आज पासून नाट्य गृह सुरू होणार असल्याची बातमी समजली. 

     मुबंई सोडून बाहेरची नाट्य गृह सुरू झाली आहेत. पण आपल्या मुंबईत महाराष्ट्राची राजधानी तिकडे नाट्य गृह अजून ही सुरू नाही ह्याचं वाईट वाटलं आणि एक तरी नाट्यगृह माझ्या माय बाप रसिक प्रेषक यांच्यासाठी नाटक सुरू झाले पाहिजे. असा ठाम विश्वास घेऊन दामोदर नाट्यगृहातील विश्वस्त आणि पदाधिकारी व बुकिंग क्लार्क आणि व्यवस्थापक सचिव हरी पाटणकर यांनी नाट्यगृह सुरू झाले पाहिजे म्हणून आजी माजी व्यवस्थापक श्री. बाबू राणे, श्री. पाटील आणि दामोदर नाट्य गृहाचे, दि सोशल सर्व्हिस लिंगचे संचालक श्री. आनंद माईणकर - अध्यक्ष, श्री. विजय वर्टी - ऊपाध्यक्ष, श्री. चंद्रकांत खोपडे - सचिव, यांच्या बरोबर चर्चा करून नाट्य गृह आपल्या रसिक प्रेक्षक यांच्यासाठी शुक्रवार  २५ डिसेंबर हया दिवसापासून सुरू करणार असल्याचे श्री. पाटणकर यांनी सांगितले.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week