बस स्थानकावर कच-याचे सम्राज्य !! प्रवासी हैराण....
मुंबई : चिंचपोकळी पश्चिम येथील गुलाबराव गणचार्य चौकातील, महानगर पालिका गँरेज च्या प्रवेश द्वारावरील क्र. 66 व क्र. 66 लि. क्र. च्या बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे.
रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालू असताना बस स्थानक तात्पुरता बेस्ट प्रशासनाने बंद ठेवला होता, आता चालू झाला आहे. पण बस स्थानकावर घाणीचे साम्राज्य आहे. परिणामी बस प्रवासी बसच्या प्रतीक्षेत उभे राहू शकत नाहीत. पावसाचे दिवस असल्याने, परिसरात दुर्गंधी पसरत असून, मलेरिया, डेंग्यू सारखे रोग पसरण्यास वेळ लागणार नाही. महानगर पालिका व बेस्ट प्रशासनाने याची तातडीने दाखल घेऊन कचरा त्वरित उचलावा, अशी नागरिकांची मागणी आहे.