
जुचंद्र नायगाव येथील भुयारी मार्गाला हिरवा कंदील !!
सार्वजनिक बांधकाम रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जुचंद्र रेल्वे फाटकावर अंदाजे १.२ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. परंतु हा उड्डाणपूल स्थानिक ग्रामस्थ रिक्षा चालक व नागरिक यांना गैरसोयीचा ठरणार असल्याने लहान वाहनांसाठी भुयारी मार्गाची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केलेली होती. या प्रकरणी मा. सभापती कन्हैया भोईर यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता. यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. तसेच जुचंद्र येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने पंचायतरांचे केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली होती. आता भुयारी मार्गाच्या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लगेच कामाला सुरुवात होणार आहे. कपिल पाटील यांनी भुयारी मार्ग बाबत रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.
मुंबई कार्यालयीन अभियंत्यांची सुद्धा भेट घेण्यात आली होती. या संदर्भात नुकतीच कन्हैया भोईर यांनी मध्य रेल्वेच्या डी. व्हाय.सी. ई. रिटा कुमारी व रेल्वे अभियंता ओ. पी. सिंग यांची पनवेल कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच पुष्पराज म्हात्रे व आशिष पाटील उपस्थित होते.
लवकरच गीत चंद्र येथील सभेच्या मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सध्याची तसेच भविष्यातील वाढती लोकसंख्या वाहन संख्या लक्षात घेता भुयारी मार्गाच्या आकारात वाढ करून आवश्यक ते फेरबदल सुचवण्यात आले होते. हलक्या वाहनांसाठी असलेला जुचंद्र सभेचा आकार आता सात मीटर रुंद व २.५ मीटर उंच असणार आहे.
एका बाजूला नागरिकांना चालण्यासाठी फूटपाथ बनवण्यात येणार आहे. यासाठी किमान चार कोटी खर्च अपेक्षित आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. ज्यामुळे जूचंद्र परिसरातील व्यापार, उद्योगधंदे, बाजार, शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय सुविधा आणि इतर उपक्रमांना याचा लाभ होणार आहे. भुयारी मार्गामुळे आजूबाजूची सात आठ गावे जितेंद्र विभागाशी जोडली जाणार आहेत. २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शिष्टमंडळामार्फत रेल्वे प्रशासनाचे आभार मानण्यात आले.