फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार, भारतीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या वतीने पाठपुरावा करीत प्रलंबित असलेल्या मागणीला यश !!

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार, भारतीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या वतीने पाठपुरावा करीत प्रलंबित असलेल्या मागणीला यश !!

     संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा  करण्यात आला असून राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये हे धोरण राबविण्यासाठी नगर विकास विभागाचे आदेश झाले आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी दिली.

      महाराष्ट्र राज्यात फेरीवाला धोरणामुळे काही अंशी रोजगार विषयक समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. तसेच पात्रता यादीत समावेश असलेल्या फेरीवाला यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी फेरीवाल्यांनी घ्यावी.

           जनतेने या रोजगार संबंधित विषयाचा उचित विचार करीत या धोरणासाठी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्यातील जनतेला भारतीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत यादव यांनी केले आहे.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने